Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चित्रपट निर्मिती अर्थसहाय्य योजनेत चित्रपट महामंडळाचा समावेश करा- महामंडळातर्फे मंत्र्यांची घेतली भेटकोल्हापुरात होणार बाराशे सांस्कृतिक कार्यक्रम ! सूर्यकांत मांढरेंच्या सिनेमांचे मोफत प्रदर्शन ! !पालखी सोहळयात गोकुळची सेवा, वारकऱ्यांना साहित्य वाटपकोल्हापुरात उभारणार मराठी सिने कलाकारांचे म्युझियम, चित्रनगरीत चित्रपट शिक्षण केंद्र- मंत्री आशिष शेलारधनंजय महाडिक सिनेमा कलाकार ! तरुणपणी केलेली कृष्णाची भूमिका !! कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूरच्या पर्यटकाचा मृतदेह सापडलासरकारकडून चित्रपट महामंडळावर अन्याय, अनुदान योजनेवरील सदस्यत्व घेतले काढूनआलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात दहा जुलैला सांगलीत मोर्चाशिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले !  हर्षल सुर्वे, विशाल देवकुळेंना नवी जबाबदारी!शिक्षण सहसंचालक कार्यालयावर अखेर अॅक्शन, तीन अधिकारी निलंबित

जाहिरात

 

मुख्यमंत्र्यांची सूचना, चंद्रकांत पाटलांनी घातले महापालिका निवडणुकीत लक्ष, नगरसेवकांसोबत बैठक !

schedule27 Jun 25 person by visibility 87 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे नेते व  मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात भाजपाचे नेते, पदाधिकारी व काही माजी नगरसेवकांसोबत बैठक घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्री पाटील यांनी कोल्हापूर महापालिका निवडणुकीत लक्ष घातले आहे. पाटील यांनी मतदारसंघनिहाय आढावा घेतला. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरचा महापौर महायुतीचाच करणार असा निर्धार यावेळी करण्यात आला. खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच सुरू होत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मंत्री पाटील हे शुक्रवारी, कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापुरातील नगरसेवकांच्या भेटी घेतल्या

या बैठकीला प्रा.जयंत पाटील, प्रदेश सचिव  महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, माजी महापौर दिपक जाधव, माजी नगरसेवक विजय सुर्यवंशी, आशिष ढवळे, मुरलीधर जाधव, सतीश घोरपडे, निलेश देसाई, शेखर कुसाळे, राजसिंह शेळके, किरण शिराळे, दिलीप पोवार, कमलाकर भोपळे, किरण नकाते, रुपाराणी निकम,  उमा इंगळे, माधुरी नकाते, मनिषा कुंभार, भाग्यश्री शेटके, विशाल शिराळे, यांची उपस्थिती होती.  मंत्री पाटील, खासदार महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये दोघा-दोघा नगरसेवकांसोबत चर्चा करण्यात आली.

 यावेळी प्रमुख पदाधिकारी सर्व नगरसेवकांनी केंद्रात राज्यात आपली सत्ता असल्यामुळे यावेळी महानगरपालिकेत देखील आपली सत्ता आणल्यास कोल्हापूरचा सर्वांगीण विकास होण्यास सहाय्यभूत ठरेल असा विश्वास व्यक्त केला. पाटील यांनी  कोल्हापूर महानगरपालिकेसाठी जास्तीत जास्त वेळ देऊन महायुतीचा महापौर होण्यासाठी  सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या असल्याचे अधोरेखित केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes