+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustएनआयटीचे विद्यार्थी तंत्रशिक्षण बोर्डाच्या परीक्षेत अव्वल adjustजरग विद्यामंदिरमध्ये नानासो जरग यांना श्रद्धांजली adjustकोल्हापुरात ट्रक महोत्सव उत्साहात ! चेतन मोटर्स - टाटा मोटर्सचा पुढाकार !! adjustबालिश नेत्याची मुलं विशाळगड आंदोलनात का नव्हती ? सतेज पाटलांचा खासदार महाडिकांना टोला adjustसदभावना रॅलीतून प्रकटला सामाजिक एकोप्यावरील विश्वास adjustशहरातील पाणी पुरवठासंबंधी भाजप नगरसेवकांची अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठक adjustमहायुती, महाविकासला पर्याय परिवर्तन आघाडी ! पुण्यात विविध संघटना नेत्यांची बैठक !! adjustव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीवर आघाडीचा बहिष्कार ! कुलगुरुंच्यावर मनमानी कारभाराचा आरोप !! adjust४२ हजार वीज कंत्राटी कामगारांना न्याय कधी मिळणार ? राज्यभर आमरण उपोषणाचा इशारा adjustप्रशासकीय कामकाजाला हवा माणुसकीचा चेहरा !
1000621806
1000615695
1000597139
1000567748
1000562876
1000551727
schedule10 Jul 24 person by visibility 77 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संंघ तथा गोकुळने प्राथमिक दूध संस्थांना इमारत बांधकामसाठी पंधरा हजार रुपयांचीं वाढ केली आहे. दूध संस्था बळकटीकरणासाठी हा निर्णय घेतल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डांगळे यांनी सांगितले. 
  गोकुळने नेहमीच दूध उत्पादक, सभासद बरोबरच प्राथमिक दूध संस्थांचे  हित जोपासले आहे. संलग्न दूध संस्थाचे बळकटीकरण करण्यासाठी दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान योजनेमध्ये गोकुळला प्रतिदिन १ ते ४०० लिटर पर्यंत दूध पुरवठा करणाऱ्या संस्थेस १० हजार रुपये व प्रतिदिन ५०१ लिटर च्या पुढील दूध पुरवठा करीत असलेल्या संस्थेस अनुदान रक्कमेत १५ हजार रुपये ची वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या मिटिंग मध्ये करण्यात आला.  अनुदान योजना  एक जुलैपासून लागू करण्यात आली आहे. अशी माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.
  ‘गोकुळला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील ६ हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांनाच्या माध्यमातून जवळ-जवळ १६ लाख लिटर प्रतिदिन संकलन केले जाते. दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान योजना संघाने १९९० पासून चालू केली असून आतापर्यंत गोकुळ संलग्न ९१५ प्राथमिक दूध संस्थांना २ कोटी ३८ लाख ३० हजार रुपये इतके इमारत बांधकाम अनुदान संघामार्फत आदा केले आहे. या योजनेमध्ये ज्या गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्था नवीन इमारत, जुनी इमारत खरेदी अथवा दुसरा मजला व स्वमालकीच्या इमारत शेजारी बांधकाम केलेस अशा दूध संस्थांना प्रोत्साहन पर त्यांच्या संकलनानुसार अनुदान दिले जाते. सध्याच्या महागाईचा विचार करता संस्थांना इमारत बांधकाम अनुदानामध्ये वाढ करणेत यावी अशी संस्थांची वारंवार मागणी होत होती. यानुसार अनुदानात रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
          इमारत बांधकाम अनुदानात संघास १ ते १०० लिटर दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थेस ३२ हजार रुपये, १०१ ते २०० लिटर दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थेस ३७ हजार रुपये, २०१ ते ३०० लिटर दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थेस ४० हजार रुपये, ३०१ ते ५०० लिटर दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थेस ४५ हजार रुपये तर ५०१ लिटर दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थेस ५० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सन २०१० पूर्वी अनुदान दिलेले आहे अशा संस्थांना मागील दिलेल्या अनुदान वजावट करून शिल्लक राहिलेली रक्कम दुसरा मजला अनुदान दिले जाईल असे म्हटले आहे.