कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा, दोन्ही वर्षात २८ शिक्षकांना सन्मानित
schedule04 Sep 25 person by visibility 434 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. २०२४- २५ व २०२५- २६ या दोन वर्षातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादी शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केली. दोन्ही वर्षातील मिळून २८ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.जिल्हा निवडसमिती शिक्षकांची ५० गुणांची मुलाखत व सादरीकरण याद्वारे गुणदान करुन अंतिम निवड यादी घोषित केली. प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादी प्रसिद्धीस दिली आहे.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार : श्रीमती अर्चना मारुती म्हांगोरे ( विद्यामंदिर शेळप, आजरा ), मारुती गणपती देवेकर (विद्यामंदिर सोनाळी, भुदरगड), श्रीमती किर्ती सुधीर पाटील ( विद्यामंदिर तडशिनहाळ, चंदगड), श्रीमत वैशाी पांडूरंग भोईटे (हसरचंपू विद्यामंदिर, गडहिंग्लज), श्रीमती छाया मधुकर चौगुले (म्हाकवे विद्यामंदिर, कागल), बंडोपंत केशव पाटील (राधानगरी विद्यामंदिर), राजमोहन जगन्नाथ पाटील (भादोली विद्यामंदिर नं.२), आनंदा पांडूरंग पाटील (विद्यामंदिर बाचणी, कागल), श्रीमती उर्मिला अनिल तेली (केंद्रशाळा वेतवडे, पन्हाळा), भानुदास रामचंद्र सुतार (विद्यामंदिर परखंदळे, शाहूवाडी), महमदअसिफ खलील मुजावर (उर्दू विद्यामंदिर घोसरवाड), बाजीराव दादू जाधव (विद्यामंदिर तिळवे बुद्रुक, गगनबावडा). विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कार विद्यामंदिर अर्जुनवाडा येथील शिक्षक गणपती लक्ष्मण कुंभार यांना जाहीर झाला आहे.
…………..
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार : श्रीमती उमा पंढरीनाथ लोणारकर (विद्यामंदिर लिंगवाडी, आजरा) यांना जाहीर झाला. भुदरगड तालुक्यातील विद्यामंदिर सोनाळी येथील मारुती आण्णा डवरी व विद्यामंदिर बेगवडे येथील शिक्षक संजय यशवंत गुरव यांना विभागून पुरस्कार दिला आहे. श्रीमती रंजिता विठठल देसूरकर (मांडवळे विद्यामंदिर, चंदगड), सतीश आप्पासाहेब तेली ( विद्यामंदिर हिटणी, गडहिंग्लज) यांना जाहीर झाला. गगनबावडा तालुक्यातील वेतवडे विद्यामंदिर येथील क्रांतिसिंह बाळकृष्ण सावंत व मांडुकली विद्यामंदिर मारुती गोविंद गुरव यांना विभागून पुरस्कार दिला आहे. सतीश पंडित पाटील (बहिरेवाडी विद्यामंदिर, कागल), संतोष श्रीपती कोळी (संभाजीनगर विद्यामंदिर सावर्डे, हातकणंगले), साताप्पा श्रीपती शेरवाडे (विद्यामंदिर मजरे कासारवाडा, राधानगरी), बाबूराव नामदेव निकम (म्हालसवडे विद्यामंदिर, करवीर), श्रीमती पल्लवी विक्रम पाटील (विद्यामंदिर तांदूळवाडी, पन्हाळा), श्रीमती ललिता यशवंत माने (विद्यामंदिर चौगलेवाडी, शाहूवाडी,), श्रीमती अपर्णा पोपट परीट (कुमार विद्यामंदिर टाकवडे शिरोळ). विशेष जिल्हा शिक्षक पुरस्कार हा विद्यामंदिर खामकरवाडी येथील राजाराम चंद्रकांत ऱ्हायकर यांना जाहीर झाला आहे.
पुरस्कार निवड प्रक्रियेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. पाटील, माध्यमिक शिक्षणााधिकारी सुवर्णा सावंत, राजाराम कॉलेजचे प्रा. रघुनाथ कडाकणे, वाकरे हायस्कूल येथील मुख्याध्यापक बी. बी. पाटील व प्राथमिक शिक्षणाधिकार शेंडकर यांचा सहभाग होता.