Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणारकल्पनेपासून उद्योगापर्यंत -नवउद्योजकांना उद्योगनिर्मितीची दिशाजिल्ह्यात चला शाळेत जाऊया अभियान, नोडल अधिकाऱ्याची नेमणूकजिप कर्मचारी सोसायटीतील अभ्यासिका - ग्रंथालयाचा लाभ घेऊन सभासदाच्या पाल्यांनी प्रशासकीय सेवेत करिअर करावेशिवसेना नगरसेवकांनी घेतली जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट, कारवाई संदर्भात दिले निवेदनगोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी मोसमी चौगुलेएमपीएससी पेपरफुटीविरोधात कोल्हापुरात तरुणाई रस्त्यावरब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या अध्यक्षपदी विवेक शुक्ल, उपाध्यक्षपदी नंदकुमार मराठेताराराणी विद्यापीठात ‘आदर्श शिक्षक - गुणवंत सेवक’ पुरस्कारांचे उत्साहात वितरणजिल्हा परिषदेच्या प्रांगणात बुधवारी रानभाजी महोत्सव

जाहिरात

 

एमपीएससी पेपरफुटीविरोधात कोल्हापुरात तरुणाई रस्त्यावर

schedule08 Sep 26 person by visibility 57 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षेच्या पेपरफुटीच्या विरोधात तरुणाई सोमवारी, सात सप्टेंबर २०२६ रस्त्यावर उतरली. समस्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीतर्फे आंदोलन आयोजित केले होते. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला.पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

‘हक्कांसाठी लढणं आमचा धर्म आहे, पेपरफुटी प्रकरणातील दोषींना शिक्षा द्या, पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे’ असे फलक हाती घेऊन विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने आंदोलनात सहभागी झाले. दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, बसंत बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. आंदोलनात जॉर्ज क्रूझ, श्वेता परुळेकर, शुभम शिरहट्टी, सारिका घुगे, अरुण पाटील, शुभम यादव, बाबासाहेब माने, विवेकानंद पाटील, ओंकार पाटील, साक्षी कुसळे, राहुल इंगळे, अनिकेत पाटील, प्रेम चौगुले यांच्यासह विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी होते. शिष्टमंडळाने, जिल्हाधिकारी विजय राठोड यांना निवेदन दिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes