ब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या अध्यक्षपदी विवेक शुक्ल, उपाध्यक्षपदी नंदकुमार मराठे
schedule08 Sep 26 person by visibility 5 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :अमृतमहोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या अध्यक्षपदी अॅड. विवेक शुक्ल, उपाध्यक्षपदी नंदकुमार मराठे यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ संचालक डॉ. दीपक आंबर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या संचालकांची बैठक झाली. याप्रसंगी कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्यवाहपदी श्रीकांत लिमये, सहकार्यवाहपदी अॅड. पूजा जोशी, खजानिसपदी प्रसाद खाडिलकर यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. दीपक आंबर्डेकर, किरण धर्माधिकारी, डॉ. उदय कुलकर्णी, संतोष कोडोलीकर, वृषाली कुलकर्णी, रामचंद्र टोपकर, अनुराधा गोसावी, रामचंद्र पुरोहित, प्रा. सुधीर जोशी, एन. ए. कुलकर्णी यांचा समावेश आहे.