गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणार
schedule09 Sep 26 person by visibility 49 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आरोप- प्रत्यारोप, पात्र - अपात्र संस्था आणि कोर्टाचा निकाल यामुळे सातत्याने चर्चेत राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी 9 सप्टेंबर 2026 रोजी जाहीर होणार आहे. प्रांताधिकारी तथा गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले या बुधवारी दुपारी चार वाजता गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहेत. गेली सहा महिने गोकुळ निवडणूक कधी होणार , कार्यक्रम कोणत्या तारखेला जाहीर होणार याकडे लक्ष लागले होते. गोकुळच्या ठरावधारकवरून साऱ्याच नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती. अवसायनातील संस्थांच्या पात्रतेवरून महायुतीतील नेते मंडळीतही कुरघोडी झाल्या. माजी चेअरमन व संचालकानी संपर्कदौरे केले. मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नेते व जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी समविचारी पक्षांची आघाडी करून निवडणूक लढवू अशी घोषणा केली आहे