Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गगन डढजिप कर्मचारी सोसायटीतील अभ्यासिका - ग्रंथालयाचा लाभ घेऊन सभासदाच्या पाल्यांनी प्रशासकीय सेवेत करिअर करावेशिवसेना नगरसेवकांनी घेतली जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट, कारवाई संदर्भात दिले निवेदनगोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी मोसमी चौगुलेएमपीएससी पेपरफुटीविरोधात कोल्हापुरात तरुणाई रस्त्यावरब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या अध्यक्षपदी विवेक शुक्ल, उपाध्यक्षपदी नंदकुमार मराठेताराराणी विद्यापीठात ‘आदर्श शिक्षक - गुणवंत सेवक’ पुरस्कारांचे उत्साहात वितरणजिल्हा परिषदेच्या प्रांगणात बुधवारी रानभाजी महोत्सवप्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांना डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्रदानशाळा वाचवा-  शिक्षण वाचवासाठी पाच ऑक्टोबरला मुंबईत धरणे आंदोलन

जाहिरात

 

जिप कर्मचारी सोसायटीतील अभ्यासिका - ग्रंथालयाचा लाभ घेऊन सभासदाच्या पाल्यांनी प्रशासकीय सेवेत करिअर करावे

schedule08 Sep 26 person by visibility 19 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी या संस्थेच्यावतीने सभासदांच्या मुलांसाठी अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके व ग्रंथालय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधांचा लाभ घेऊन सभासदांच्या मुलांनी प्रशासकीय सेवेत करिअर करावे असे आवाहन मान्यवरांनी केले.  

 सोसायटीच्या हिरक महोत्सव वर्षांत पदापर्णानिमित्त संस्थेच्या सभासदांचे मुला-मुलींसाठी स्पर्धा परिक्षेसाठी सुसज्ज अभ्यासिका ग्रंथालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, मुख्य लेखा वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग प्रमोद बाबर यांचे हस्ते झाले. याप्रसंगी अधिकाऱ्यांनी सोसायटीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.  मंगळवारी, आठ सप्टेंबर २०२६ रोजी अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले.

अभ्यासिका ही सुसज्ज पुस्तकासह मुलांचे अभ्यासासाठी उपलब्ध आहे. अभ्यासिकेचा लाभ हा सभासदांच्या मुलांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या मुलांनी घ्यावा’ असे अवाहन संस्थेच्या वतीने चेअरमन संजय शिंदे यांनी केले. याप्रसंगी व्हाइस चेअरमन जयकुमार रेळेकर, -संचालक नंदिप मोरे, श्रीकांत चव्हाण, रविंद्र जरळी, सुनिल पाटील, साताप्पा मगदूम, सुधाकर कांबळे, सचिन गुरव, उत्तम वावरे, रणजित पाटील, मुजम्मिल नावळेकर, अमर पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, अजय शिंदे, सरदार दिंडे, सरोजिनी कोरी, सोनाली गुरव, तज्ञ संचालक - प्रविणकुमार पाटील, स्वप्निल घस्ते आदी उपस्थित होते.

संस्थेचे मार्गदर्शक- एम. आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकूरे, एम.एम. पाटील, के. आर. किरूळकर, राजाराम वरूटे, राजीव परीट, रविकुमार पाटील, मनोहर भाट, सात्ताप्पा मोहिते, अजित मगदुम, शांताराम माने, विजय टिपुगडे, प्रतिभा शिर्के, एन. डी. पाटील, अनिल आवळे, किरण मगदुम, दगडू परीट, कपिल पाटील आदींच्या माार्दर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरू आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes