Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात बुधवारी रानभाजी महोत्सवप्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांना डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्रदानशाळा वाचवा-  शिक्षण वाचवासाठी पाच ऑक्टोबरला मुंबईत धरणे आंदोलनकोल्हापुरात तीन दिवसीय “ग्लोरियस"  वैद्यकीय परिषदजिप कर्मचारी सहकारी सोसायटीतर्फे सभासदांच्या पाल्यासाठी अभ्यासिकाकोरे अभियांत्रिकीत ‘मल्टी-बिझनेस मॉडेल इनोव्हेशन’वर मार्गदर्शनप्राचार्य डॉ. धनाजी कणसे यांना आदर्श राज्य प्राचार्य पुरस्कारनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या –डॉ. राकेश कुमार शर्मासंवाद  औपचारिकतेपलीकडचा : विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पांचा! कुलगुरुंच्या निवासस्थानची हृदय भेट ! !आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी गुणांकन, तीन वर्षांच्या रिपोर्ट कार्डवर श्रेणी निश्चिती

जाहिरात

 

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात बुधवारी रानभाजी महोत्सव

schedule07 Sep 26 person by visibility 17 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी   : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून उत्पादित होणाऱ्या विविध रानभाज्या व पारंपरिक खाद्यपदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, रानभाज्यांचे पौष्टिक व आरोग्यदायी महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच ग्रामीण महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बुधवारी, ९ सप्टेंबर २०२६ रोजी रानभाजी महोत्सव आयोजित केला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात हा महोत्सव होत आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

महोत्सवामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत महिला स्वयंसहायता समूह सहभागी होणार आहेत. विविध तालुक्यांतील समूहांकडून स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्या, पारंपरिक खाद्यपदार्थ तसेच महिला समूहांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे स्टॉल या महोत्सवामध्ये लावण्यात येणार आहेत. ग्रामीण महिलांच्या कौशल्य, उत्पादनक्षमता व उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा हा महोत्सव ठरणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या रानभाजी महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध रानभाज्या, पारंपरिक खाद्यपदार्थ व महिला स्वयंसहायता समूहांची उत्पादने जाणून घ्यावीत व ग्रामीण महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes