Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्ह्यात चला शाळेत जाऊया अभियान, नोडल अधिकाऱ्याची नेमणूकजिप कर्मचारी सोसायटीतील अभ्यासिका - ग्रंथालयाचा लाभ घेऊन सभासदाच्या पाल्यांनी प्रशासकीय सेवेत करिअर करावेशिवसेना नगरसेवकांनी घेतली जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट, कारवाई संदर्भात दिले निवेदनगोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी मोसमी चौगुलेएमपीएससी पेपरफुटीविरोधात कोल्हापुरात तरुणाई रस्त्यावरब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या अध्यक्षपदी विवेक शुक्ल, उपाध्यक्षपदी नंदकुमार मराठेताराराणी विद्यापीठात ‘आदर्श शिक्षक - गुणवंत सेवक’ पुरस्कारांचे उत्साहात वितरणजिल्हा परिषदेच्या प्रांगणात बुधवारी रानभाजी महोत्सवप्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांना डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्रदानशाळा वाचवा-  शिक्षण वाचवासाठी पाच ऑक्टोबरला मुंबईत धरणे आंदोलन

जाहिरात

 

जिल्ह्यात चला शाळेत जाऊया अभियान, नोडल अधिकाऱ्याची नेमणूक

schedule08 Sep 26 person by visibility 30 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्यातील सर्व माध्यम व व्यवस्थापनांच्या शाळांमधून ५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत राबविले जाणारे ‘चला शाळेत जाऊया अभियान’ सुरु झाले आहे. जिल्ह्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. "चला शाळेत जाऊया अभियान" अंतर्गत जिल्हा नोडल अधिकारी म्हणून ८ व ९ सप्टेंबर, २२ व २३ सप्टेंबर आणि ७ व ८ ऑक्टोबर, रोजी जिल्ह्यातील शाळा व क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन आढावा घेणार आहेत.

या अभियानांतर्गत जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शाळांमधील भौतिक सुविधा (शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे, वर्गखोल्यांची दुरुस्ती व नवीन वर्गखोल्या, शाळा व परिसर स्वच्छता, क्रीडांगण व कुंपण भिंत, वीज, आवश्यक फर्निचर, ई-सुविधा). विद्यार्थ्यांचे गणवेश व पोषण आहार वितरणाची सद्यस्थिती व वेळेवर पुरवठा. गुणवत्ता विकासाचे विविध उपक्रम, सर्वेक्षण अहवाल व त्यानुसार आवश्यक सुधारणा. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी लोकसहभाग व सामाजिक दायित्व निधी (CSR) मिळवण्यासाठी प्रयत्न. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि जिल्ह्यातील शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे  सक्षमीकरण यांचा आढावा घेण्यात येणार आहे.दोन दिवसांच्या भेटीअंती प्रशासकीय व शैक्षणिक गुणवत्तेबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक घुगे यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes