योगिता कोडोलीकर, मायादेवी भंडारे यांची माघार
schedule02 Jan 26 person by visibility 105 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार योगिता कोडोलीकर, तसेच माजी नगरसेविका मायादेवी भंडारे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. प्रभाग क्रमांक चार मध्ये राष्ट्रवादीकडून कोडोलीकर व शिवसेनेकडून शुभांगी रमेश भोसले यांची उमेदवारी जाहीर झाली होती. ज्या त्या पक्षाने दोघांनाही एबी फॉर्म दिला होता. दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले होते यामुळे या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार की दोघांपैकी कोण माघार घेणार याकडे लक्ष लागले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी 2 जानेवारी रोजी कोडोलीकर यांनी अर्ज मागे घेतला. दरम्यान अर्ज घेण्यावरून कोडोलीकर व भंडारी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली.
डॉ. व्ही टी पाटील स्मृती भवन येथील निवडणूक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या प्रभागामधील माघार घेतलेल्या उमेदवारांच्यामध्ये श्रुती अमित पाटील, गीता अजित तिवडे, किरण रामचंद्र माजगावकर, नम्रता राकेश महाडिक, ऋतुजा अजित जाधव तेजस्विनी विजयसिंह माने, परवेज दिलावरखान पठाण यांचा समावेश आहे.