प्रभाग बारामधून जितू सलगरची माघार, महायुतीला पाठिंबा
schedule02 Jan 26 person by visibility 134 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारीप्रचंड घडामोडी सुरू आहेत. प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी नगरसेवक जितू सरगर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत महायुतीला पाठिंबा दिला. सलगर यांनी यापूर्वी स्थायी समितीचे सभापती म्हणून काम केले होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शब्दाला मान देत सरगर यांनी माघार घेतली. शिवाय प्रभाग 12 मतदारसंघातील महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितले. दरम्यान आमदार क्षीरसागर यांनी महायुतीच्या उमेदवारांच्यासाठी सलगर यांनी माघार घेत पाठिंबा दिला आहे. त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल. असे सांगितले. याप्रसंगी उद्योजक तेज घाटगे, महायुतीचे उमेदवार आशकीन नाजरेकर उपस्थित होते.