Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजकारणात कदमांच्या तिसऱ्या पिढीचे पाऊल, स्वरुप ठरतोय आश्वासक चेहराव्हिजन मॉडर्न प्रभागाचे…स्मार्ट कोल्हापूरचे ! हटके काम, स्मार्ट प्रभाग ! नकातेंचा विकासकामांचा धडाका ! !मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानला कोल्हापुरात प्रतिसाद, लोकवर्गणीतून जमली कोट्यवधीची रक्कममहायुतीच्या प्रचाराला मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री येणार, महायुती प्रचंड मतांनी विजयी होईल संयमी नेतृत्वाचे, विकासात्मक व्हिजन विश्वास लोकांचा, सुभाष बुचडे प्रभागाच्या हक्काचेजिल्हा परिषदेच्या शाळेत पिंक रुम, राज्यातील पहिला प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातझाडू कामगाराचा मुलगा महापालिकेच्या मैदानात, प्रभागात ठरतोय हक्काचा उमेदवारनिवडणुकीनंतर महापालिकेतील सत्तेच्या चाव्या जनसुराज्य शक्ती पक्ष - आरपीआयकडे असतील : समित कदम

जाहिरात

 

व्हिजन मॉडर्न प्रभागाचे…स्मार्ट कोल्हापूरचे !

schedule02 Jan 26 person by visibility 38 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : समाजकारण व राजकारणात वेगळी छाप उमटविणाऱ्या कोल्हापुरातील मोजक्या कुटुंबापैकी जाधव कुटुंबीय एक. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या औद्योगिक कार्याचा, समाजकार्याचा व विकासाकामांचा वारसा तितक्याच समर्थपणे पुढे चालविणारे आश्वासक नेतृत्व म्हणजे सत्यजित चंद्रकांत जाधव. ‘व्हिजन मॉडर्न प्रभागाचे…स्मार्ट कोल्हापूरचे’ही संकल्पना उराशी बाळगून ते महापालिका निवडणुकीत उतरले आहेत. शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक ११ मधून ते निवडणूक लढवित आहेत. निवडणूक जाहीर झाल्यापासून लोकांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद हा आश्वासक आहे. नव्या पिढीतील हे नेतृत्व उद्याच्या कोल्हापूरसाठी दमदार कामगिरी करण्याचा ध्यास बाळगून आहे.

माजी आमदार चंद्रकांत जाधव, शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री जाधव यांचे ते चिरंजीव. स्वर्गीय चंद्रकांत जाधव म्हणजे कोल्हापूरच्या जनतेशी समरस झालेले व्यक्तिमत्व. अनेक संस्थांचे ते आधारवड होते. त्यांनी कला, क्रीडा, शिक्षण व सामाजिक क्षेत्राला प्रोत्साहित केले. आमदार म्हणून त्यांनी केलेले काम आजही लोकांच्या स्मरणात आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता त्यांनी लोकांना मदत केली. वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या. शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री जाधव यांनी आमदारपदाच्या कालावधीत साऱ्यांना बरोबर घेऊन विकास योजना राबविल्या. या कुटुंबांतील पुढील पिढी आता सत्यजीत जाधव यांच्या माध्यमातून समाजजीवन व राजकारणात सक्रिय आहे.

दिवगंग आमदार चंद्रकांत जाधव यांच्या औद्योगिक कार्याचा, समाजकार्याचा, विकासकामांचा वारसा दमदारपणे चालवित आहेत. विविध क्षेत्रात सक्रिय आहेत. कैलासगडची स्वारी मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत. तसेचरावणेश्वर मंदिर ट्रस्टे अध्यक्ष आहेत. गोकुळशिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे संचालकपदाचा अनुभव आहे. रेटरी क्लबचे सदस्य आहेत. जाधव ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचाक आहेत. महालक्ष्मी लॉजिस्टिकचे सीईओपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. उद्योग व्यवसाय सांभाळत समाजकार्य व राजकारण करताना वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्पष्ट विचार, सकारात्मक वृत्ती आणि साऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत यामुळे या तरुण नेतृत्वाला मतदारांची पसंती लाभत आहे. त्यांना, उद्ममशीलतेचा वसा लाभला आहे. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यावर भर आहे. शिवसेनेतील हा तरुण व आश्वासक चेहरा. प्रभाग क्रमांक ११ मधून महापालिका निवडणूक लढवित आहे. त्यांच्या ठायी विकासात्मक दृष्टिकोन आहे. मॉडर्न प्रभाग आणि स्मार्ट कोल्हापूर ही संकल्पना आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes