Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजकारणात कदमांच्या तिसऱ्या पिढीचे पाऊल, स्वरुप ठरतोय आश्वासक चेहराव्हिजन मॉडर्न प्रभागाचे…स्मार्ट कोल्हापूरचे ! हटके काम, स्मार्ट प्रभाग ! नकातेंचा विकासकामांचा धडाका ! !मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानला कोल्हापुरात प्रतिसाद, लोकवर्गणीतून जमली कोट्यवधीची रक्कममहायुतीच्या प्रचाराला मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री येणार, महायुती प्रचंड मतांनी विजयी होईल संयमी नेतृत्वाचे, विकासात्मक व्हिजन विश्वास लोकांचा, सुभाष बुचडे प्रभागाच्या हक्काचेजिल्हा परिषदेच्या शाळेत पिंक रुम, राज्यातील पहिला प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातझाडू कामगाराचा मुलगा महापालिकेच्या मैदानात, प्रभागात ठरतोय हक्काचा उमेदवारनिवडणुकीनंतर महापालिकेतील सत्तेच्या चाव्या जनसुराज्य शक्ती पक्ष - आरपीआयकडे असतील : समित कदम

जाहिरात

 

राजकारणात कदमांच्या तिसऱ्या पिढीचे पाऊल, स्वरुप ठरतोय आश्वासक चेहरा

schedule02 Jan 26 person by visibility 27 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भोसलेवाडी-कदमवाडी हा शहराचा एक भाग. नावात वाडी असली तर कोल्हापूरच्या समाजजीवनाशी एकरुप झालेली वस्ती. याठिकाणी ग्रामीण संस्कृती आणि शहरी तोंडवळा याचा मिलाफ दिसतो. या भागात साऱ्यांना सोबत घेऊन जाणारे कुटुंब म्हणजे कदम कुटुंबीय. माजी महापौर शिवाजीराव कदम यांच्या पाठोपाठ माजी महापौर सुनील कदम, शिवसेनेचे जिल्हा समन्यवक सत्यजीत कदम यांचा समाजकारण व राजकारणात वेगळी ओळख. कदम कुटुंबांतील तिसरी पिढी आता समाजकारण व राजकारणात सक्रिय झाली आहे, नव्या पिढीतील हा आश्वासक चेहरा आहे, स्वरुप सुनील कदम !

उच्चशिक्षित असलेला हा तरुण नव्या विचारांनी, नवं संकल्पना घेऊन या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. प्रभाग क्रमांक दोन मधील सर्वसाधारण गटाचे उमेदवार आहेत. महापालिका निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढवित आहेत. बदलणारे कोल्हापूर, विस्तारणार कोल्हापूर, तरुणांच्या नव्या आकांक्षा या साऱ्यांची सांगड घालत नव्या विचारांनी ते नव्या प्रांतात प्रवेश करत आहेत. कोल्हापूरसाठी चांगले काही तरी घडवायचं, कामाच्या माध्यमातून प्रभागाची वेगळी ओळख तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांना, समाजकार्य व राजकीय वारसा कुटुंबाकडून् लाभला आहे. मुळात कदम कुटुंबीय हे शेतकरी घराण्यातील. मात्र गेली अनेक दशके कदम कुटुंब हे समाजकारण व राजकारणात काम करत आहे.

शिवाजीराव कदम हे १९६७ मध्ये नगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदा विजयी झाले. पुढे महापालिकेची स्थापना झाली. त्या निवडणुकीत त्यांनी विजयाची पुनरावर्ती केली. मात्र १९८५ मध्ये त्यांचा विजय थोडक्यात हुकला. शिवाजीराव कदमांचा हा पराभव पुतण्या सुनील कदम यांच्या जिव्हारी लागला. सुनील कदमांनी १९९० मधील निवडणूक लढविली. भीमराव पवार यांचा पराभव करत विजयश्री मिळवला. १९९० मधील निवडणुकीत सुनील कदम यांनी विजय संपादन केला. या भागातील लोकांनी सातत्याने कदम यांच्या कुटुंबांतील सदस्यावर विश्वास व्यक्त केला. दरम्यान १९९५ मधील निवडणुकीत शिवाजीराव कदम विजयी होऊन महापौर झाले तर २००० मधील निवडणुकीत सुनील कदम हे विजयी होऊन पुढे महापौर झाले.

  हा राजकीय वारसा सत्यजित कदम यांनी तितक्याच ताकतीने चालविला. अभ्यासू नगरसेवक, धडाडीचा कार्यकर्ता, गटनेता म्हणून सत्यजीत कदम यांनी कोल्हापूर शहरात ओळख निर्माण केली. शहरांशी संबंधित विविध विषयावर सभागृहात आवाज उठविला. आता कदम कुटुंबातील तिसरी पिढी, स्वरुप सुनील कदम यांच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाली आहे. नव्या पिढीची आशा आकांक्षा जाणून त्यांना मूर्त रुप देण्यासाठी ताकतीने काम करू हा त्यांचा विश्वास मतदारांना भावत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes