महायुतीच्या प्रचाराला मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री येणार, महायुती प्रचंड मतांनी विजयी होईल
schedule01 Jan 26 person by visibility 281 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेतेमंडळींनी तीनही पक्षाच्या उमेदवारांशी संवाद साधला. निवडणुकीतील प्रचार, विकास योजनांची अंमलबजावणी यासंदर्भात कार्यशाळा झाली. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. हॉटेल पॅव्हेलियन येथे आयोजित या बैठकीला महायुतीचे उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी, ‘महायुती प्रचंड मतांनी विजयी होईल महापालिकेवर युतीचा झेडा फडकेल.’असा विश्वास केला. मुश्रीफ म्हणाले, ‘महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापुरात येणार आहेत.’
दरम्यान बैठकीत नेतेमंडळींनी निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. कशा प्रकारचा प्रचार करावा, चौघा उमेदवारांनी एकत्र फिरुन लोकांच्या अपेक्षा जाणाव्यात, विकासाच्या योजना मांडाव्यात. महायुतीतील नेते मंडळींसह अनेक उमेदवारांनी निवडणुका लढल्या आहेत. तीनही पक्षाच्या उमेदवारांना व नेत्यांना त्याचा अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर महायुतीचे उमेदवार विजयी होतील. महायुतीवर भगवा फडकेल.’ खासदार धनंजय महाडिक म्हणाले, "काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या एकाधिकारशाहीला जनता कंटाळली आहे. जनाधार संपल्यामुळे ते सैरभर झाले आहेत. महापालिका निवडणुकीत महायुतीला निर्विवाद यश मिळेल. महायुतीच्या उमेदवारांमध्ये युवकांना मोठी संधी दिली आहे. " राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनीही महापालिका निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळेल. महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल असे सांगितले. दरम्यान या बैठकीला माजी महापौर सुनील कदम, प्रा. जयंत पाटील, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, शिवसेनेचे जिल्हा समन्यवक सत्यजीत कदम, शारंगधर देशमुख, विजय सुर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शिवसेनेचे पदाधिकारी ऋतुराज क्षीरसागर, सत्यजित जाधव, राहुल चिकोडे, प्रकाश नाईकनवरे, अजित मोरे, रत्नेश शिरोळकर, मुरलीधर जाधव, अजित ठाणेकर, अभय तेंडुलकर, किरण नकाते, प्रकाश गवंडी, संजय पाटील, निलेश देसाई, नेपोलियन सोनुले आदी उपस्थित होते.