Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजकारणात कदमांच्या तिसऱ्या पिढीचे पाऊल, स्वरुप ठरतोय आश्वासक चेहराव्हिजन मॉडर्न प्रभागाचे…स्मार्ट कोल्हापूरचे ! हटके काम, स्मार्ट प्रभाग ! नकातेंचा विकासकामांचा धडाका ! !मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानला कोल्हापुरात प्रतिसाद, लोकवर्गणीतून जमली कोट्यवधीची रक्कममहायुतीच्या प्रचाराला मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री येणार, महायुती प्रचंड मतांनी विजयी होईल संयमी नेतृत्वाचे, विकासात्मक व्हिजन विश्वास लोकांचा, सुभाष बुचडे प्रभागाच्या हक्काचेजिल्हा परिषदेच्या शाळेत पिंक रुम, राज्यातील पहिला प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातझाडू कामगाराचा मुलगा महापालिकेच्या मैदानात, प्रभागात ठरतोय हक्काचा उमेदवारनिवडणुकीनंतर महापालिकेतील सत्तेच्या चाव्या जनसुराज्य शक्ती पक्ष - आरपीआयकडे असतील : समित कदम

जाहिरात

 

हटके काम, स्मार्ट प्रभाग ! नकातेंचा विकासकामांचा धडाका ! !

schedule02 Jan 26 person by visibility 57 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘बांधिलकी जनतेशीध्यास प्रभागाच्या विकासाचा’हे सूत्र ठेवून मतदारसंघात काम करणारे नगरसेवक म्हणजे किरण नकाते आणि माधुरी नकाते. विकासकामांच्या जोरावर आणि जनसंपर्काच्या बळावर माजी नगरसेविका माधुरी नकाते या जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मधून निवडणूक लढवित आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत.

प्रभागातील पायाभूत सुविधांची पूर्तता करण्याबरोबरच महिलांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी,बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी दरवर्षी मैत्रीण महोत्सव आयोजित केला जातो.  महोत्सव कालावधीत सांस्कृ्तिक कार्यक्रमांची रेलचेल असते. बचत गटाचे खाद्याचे स्टॉल असतात. मैत्रीण फाऊंडेशनचा मैत्रीण महोत्सव म्हणजे, संभाजीनगर, गजानन महाराजनगर, मंगळवार पेठ, नेहरुनगर यासह आसपासच्या भागातील लोकांसाठी वेगळी पर्वणी ठरली आहे. महिला सक्षमीकरण हा उद्देश ठेवून आयोजित केला जाणारा मैत्रीण महोत्सव हा बचत गटासाठी आधारवड ठरला आहे.

प्रभागाच्या विकासासाठी धडपडणारा कार्यकर्ता म्हणजे किरण नकाते अशी भागात ओळख आहे. जवळपास तीन दशकाहून अधिक काळ सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. माजी आमदार महोदवराव महाडिक,  मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, माजी नगरसेवक सुहास लटोरे  यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन भागाचा विकास साधला. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लावली. कॉलनीतील अंतर्गत रस्ते केले. जे जे लोकांना आवश्यक आहे, त्या साऱ्या पायाभूत सुविधा प्रभागात निर्माण केल्या. हरित प्रभाग अभियान राबवित प्रभागातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला रोपांची लागवड केली. गेली पंधरा वर्षे असंख्य भाविकांना तिरुपती दर्शन घडवितात.

भागात ड्रेनेज लाइनची व्यवस्था निर्माण केली. प्रभागातील लहान मुले, ज्येष्ठ मंडळी यांच्याकरिता उद्याने विकसित केली. प्रभाग स्वच्छ व सुरक्षित राहिला पाहिजे यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. संभाजीनगर येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूलसमोरील रस्ता हा मॉडेल रस्ता तयार केला. भागातील लोकांच्या सोयीसाठी रुग्ण्वाहिका सुरू केली आहे. प्रभाग हा सर्वसुविधायुक्त असावा म्हणून स्मार्ट प्रभाग ही संकल्पना राबविली. कोरोना काळात प्रभागातील लोकांना मदत केली. महापुराच्या आपत्तीवेळी प्रशासनाला उपयुक्त् ठरेल अशी रेस्क्यू बोट मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध केली. सार्वजिनक उत्सवाला विधायकतेची जोड देण्याचा हा स्त्युत्य उपक्रम.

 गणेश उत्सव व नवरात्रोत्सवातही नकाते कुटुंबीयांचा सहभाग. मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यावर भर. करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या रथोत्सवावेळी भाविकांना प्रसाद वाटप केला जातो. गुजरी कॉर्नर येथील दहीहंडी उत्सव तर शहरवासियांचे आकर्षण असते. लोकसंपर्क व विकासकामांशी नाते जोडलेल्या नकाते यांच्यावर भाजपने विश्वास दाखवित प्रभाग क्रमांक ११ मधून उमेदवारी दिली आहे. माधुरी नकाते यांच्या प्रचाराला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes