भाजपतर्फे जिल्हा परिषद- पंचायत समितीसाठी सोमवारपासून मुलाखती
schedule02 Jan 26 person by visibility 60 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या भारतीय जनता पक्षाच्यावतीने ( कोल्हापूर पश्चिम) इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे माहिती भाजपाचे कार्यालय प्रभारी शिवाजी बुवा यांनी दिली. पाच ते सात जानेवारी 2026 या कालावधीत या मुलाखती होणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी आता तयारी सुरू केले आहे. भाजपाने इच्छुक उमेदवारांचे अर्ज जिल्हा कार्यालयाकडे मागीतले होते . त्यानुसार कोल्हापूर पश्चिम जिल्ह्यातून ६५० उमेदवारांनी आपणास उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे .
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार खासदार धनंजय महाडीक , आमदार अमल महाडीक, आमदार शिवाजीराव पाटील, माजीमंत्री भरमू पाटील, माजी आमदार संजय घाटगे, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील हे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील. दरम्यान मुलाखतीस येताना इच्छूक उमेदवाराने कोणत्याही प्रकारे शक्ती प्रदर्शन न करता स्वतःच मुलाखतीस यावे असे आवाहन करण्यात आले आहे.सोमवारी ५ जानेवारी 2026 रोजी सकाळी ११ वाजता मुलाखती सुरू होतील. आजरा, गडहिंग्लज, चंदगड या तालुक्यातील इच्छुकांच्या उमेदवारी होतील.मंगळवारी ६ जानेवारी रोजी भुदरगड , राधानगरी , कागल तर बुधवारी ७ जानेवारी रोजी कोल्हापूर दक्षिण, करवीर ,पन्हाळा, गगनबावडा तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत . यासंदर्भातील प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर जिल्हा सरचिटणीस मेजर भिकाजी जाधव, डॉ. आनंद गुरव, महेश चौगले, सौ. सुशिला पाटील यांच्या सह्या आहेत .