योगमित्रने जपली सामाजिक बांधिलकी, पहिला वर्धापनदिन उमेद फौंडेशनमध्ये साजरा
schedule27 Jan 25 person by visibility 209 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर मधील योगमित्र या ग्रुपचा पहिल्या वर्धापन दिन करवीर तालुक्यातील कोपार्डे येथील उमेद फाउंडेशनमधील मुलांसोबत साजरा करण्यात आला. मुलांना योगाच्या विविध आसनांची माहिती दिली. त्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक संवर्धन होईल याविषयी काही आसणे व श्वसन पद्धती बद्दल माहिती दिली. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून त्यांना खाऊ दिला. यावेळी उमेद फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे यांच्या अन्नधान्य सोपवण्यात आले.
योगमित्र तर्फे त्यांच्यासाठी प्रत्येक रविवारी योगाचे वर्ग घेण्याचे नियोजन केले आहे. त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस योग मित्र तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. योगमित्र च्या माध्यमातून गेले वर्षभर योग अभ्यासाविषयी जागृती करत असून विविध योग शिबिरांचे आयोजन करून लोकांना योगाचे महत्व पटवून देण्याचे काम योगमित्राचे सदस्य करीत आहेत. यावेळी योगमित्राचे सदस्य संजय पोवार, रूपाली पाटील, सुरेश देसाई, विश्वजीत पाटील, पल्लवी बकरे, उज्वला डफळे, शितल काजवे, सुषमा जाधव, सुचित्रा देसाई, सारिका पाटील, अनन्या पोवार उपस्थित होते.