यड्रावमधील बुद्धिबळ स्पर्धेत विवान सोनी अजिंक्य,अभय भोसले उपविजेता
schedule13 Mar 25 person by visibility 20 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केन चेस अकॅडमी इचलकरंजी व चेस अकॅडमी जयसिंगपूर यांनी अल्फान्सो स्कूल, यड्राव येथे आयोजित केलेल्या हातकणंगले व शिरोळ तालुका मर्यादित अकरा ते सोळा वर्षाखालील मुलांच्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित इचलकरंजीच्या विवान सोनीने अजिंक्यपद पटकाविले, द्वितीय मानांकित जांभळीच्या अभय भोसलेने उपविजेतेपद मिळवले तर इचलकरंजीच्या अथर्व तावरेने तृतीय स्थान प्राप्त केले.
या स्पर्धेमध्ये हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील एकूण ६५ नामांकित बुद्धिबळपटू सहभागी झाले होते त्यापैकी नऊ बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त होते.ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण सात फेऱ्यामध्ये घेण्यात आली. एकूण दहा हजार रुपयांचे रोख बक्षीसासह चषक व मेडल्स बक्षीस म्हणून देण्यात आले. या स्पर्धेतील विजेता विवान सोनी , उपविजेता अभय भोसले , तृतीय क्रमांक अथर्व तावरे, चौथा क्रमांक आराध्य ठाकूरदेसाई व पाचवा क्रमांक आदित्य कोळी यांना रोख रक्कम व आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .