यशराजराजेंच्या वाढदिनी टेबल टेनिस प्रशिक्षणला रोबो भेट
schedule26 Sep 23 person by visibility 273 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कुमार यशराज राजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत युवराज मालोजी छत्रपती यांनी के.एस.ए. टेबल टेनिस संकुलाला टेबल टेनिस प्रशिक्षण रोबो भेट दिला.
हा रोबो एकावेळी शंभर टेबल टेनिस बॉल वेगवेगळ्या ठिकाणी टाकू शकतो. याचा फायदा सर्व वयोगटातील मुले व मुली यांना होणार असून त्यांना त्यांच्यातील गुणवत्ता व अचूकपणा वाढवण्यासाठी मोलाचे सहाय्य लाभणार आहे.
के.एस.ए.चे टेबल टेनिस राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक संग्राम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षापासून सातत्याने के.एस.ए.चे अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर व विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. नवीन रोबोमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू चमकण्यासाठी संधी मिळणार आहे.