Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वास्तववादी इतिहास लेखन करणारा इतिहासकार हरपलासहजसेवा ट्रस्टतर्फे गायमुख येथे सोमवारपासून अन्नछत्रवारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळाचे पुरस्कार जाहीर, पाच एप्रिलला वितरणणण तत लोणेरे विद्यापीठाच्या कार्यवाह कुलगुरुपदी डॉ. राजनिश कामतकोल्हापूर सराफ सुवर्णकार संघाचा शनिवारी जिल्हास्तरीय मेळावादहा गावांच्या समावेशासह हद्दवाढीस सर्वांची संमती : नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळडॉ.. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा कोल्हापुरात तीन एप्रिलला सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरणघोषवाक्य स्पर्धेत मुख्याध्यापक संजय सौंदलगे राज्यात प्रथम

जाहिरात

 

वारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळाचे पुरस्कार जाहीर, पाच एप्रिलला वितरण

schedule26 Mar 26 person by visibility 6 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगर यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या पाच एप्रिल २०२६ रोजी पुरस्कार वितरण समारंभ आहे. स्वर्गीय विलासराव कोरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा समारंभ आयोजित केला आहे. यावेळी साहित्य पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही आहे.

 साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय स्वर्गीत तात्यासाहेब कोरे कादंबरी पुरस्कार हा लेखिका आशा नेगी यांच्या ‘ब्युटी ऑफ लाइफ’ या साहित्यकृतीला जाहीर झाला आहे. स्वर्गीय सावित्रीआक्का कोरे काव्य पुरस्कार हा कवी धनाजी धोंडिराम घोरपडे यांच्या ‘जामिनावर सुटलेला काळा घोड” या कवितासंग्रहाला, स्वर्गीय शोभाताई कोरे कथा साहित्य पुरस्कार प्रा. अरविंद मानकर यांच्या ‘घुंगरु’ कथासंग्रहाला तर स्वर्गीय विलासराव कोरे संकीर्ण साहित्य पुरस्कार हा वर्षा कुळकर्णी यांच्या ‘काळीज फूल’ साहित्याला जाहीर झाला. स्वर्गीय मामासाहेब गुळवणी बालसाहित्य पुरस्कार अॅड. संगीता केंजळे यांच्या ‘जादूची छडी’ला जाहीर झाला आहे.

या समारंभात लेखक प्रशांत कुलकर्णी यांचा ‘यशगंध’ या चरित्रात्मक उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या समारंभाच्य अध्यक्षस्थानी आमदार विनय कोरे आहेत. शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.पत्रकार परिषेदवेळी चंद्रकांत निकाडे, पी. एस. पाटील, पी.आर. आंबी, डॉ. श्रीकांत पाटील, प्रा. पी. बी. बंडगर, शिवाजी बारचाटे, धनपाल पाटील, प्रा. चंद्रकांत गिरी, प्रा. सुरेश आडके, नसीम जमादार, अभिजीत कुंभार आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes