घोषवाक्य स्पर्धेत मुख्याध्यापक संजय सौंदलगे राज्यात प्रथम
schedule24 Mar 26 person by visibility 52 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालय विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धेत आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला . गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम पुण्य दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेत हिंद - दी - चादर या विषयांतर्गत त्यांनी घोषवाक्य माहिती व जनसंपर्क विभागाकडे पाठवले होते . कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांच्या हस्ते संजय सौंदलगे यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देवून गौरवण्यात आले. सौंदलगे यांना कार्याध्यक्षा पल्लवी कोरगांवकर, अध्यक्षा सुचेता कोरगांवकर व संचालक एम . एस. पाटोळे यांचे प्रोत्साहन लाभले .