Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वास्तववादी इतिहास लेखन करणारा इतिहासकार हरपलासहजसेवा ट्रस्टतर्फे गायमुख येथे सोमवारपासून अन्नछत्रवारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळाचे पुरस्कार जाहीर, पाच एप्रिलला वितरणणण तत लोणेरे विद्यापीठाच्या कार्यवाह कुलगुरुपदी डॉ. राजनिश कामतकोल्हापूर सराफ सुवर्णकार संघाचा शनिवारी जिल्हास्तरीय मेळावादहा गावांच्या समावेशासह हद्दवाढीस सर्वांची संमती : नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळडॉ.. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा कोल्हापुरात तीन एप्रिलला सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरणघोषवाक्य स्पर्धेत मुख्याध्यापक संजय सौंदलगे राज्यात प्रथम

जाहिरात

 

सहजसेवा ट्रस्टतर्फे गायमुख येथे सोमवारपासून अन्नछत्र

schedule26 Mar 26 person by visibility 15 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सहजसेवा ट्रस्टतर्फे ३० मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत जोतिबा डोंगर येथील गायमुख येथे अन्नछत्र असणार आहे. जोतिबा यात्रेनिमित्त गेली २६ वर्षे सहजसेवा ट्रस्टतर्फे अन्नछत्राचे आयोजन केले जात आहे. त्यानुसार यंदाही यात्रा कालावधीत दिवस-रात्र अन्नछत्र सुरू राहणार आहे अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त चिंतन शहा, मनीष पटेल, चेतन परमार यांनी दिली.

यंदा, जवळपास दोन लाख भाविक या अन्नछत्रातील महाप्रसादाचा लाभ घेतील. त्यापद्धतीने नियोजन केले आहे. ज्या संस्थांना, दानशूर व्यक्तींना मदत करायची आहे त्यांनी ट्रस्टच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. अन्नछत्रासाठी पंधरा हजार चौरस फुटाचा मंडप उभारला आहे. चहा व मठ्ठा वाटपासाठी स्वतंत्र मंडप उभारला आहे. अन्नछत्र चोवीस तास सुरू राहणार आहे. तसेच २४ तास वैद्यकीय सवा व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सहजसेवा ट्रस्टचे विश्वस्त  सन्मती मिरजे, प्रमोद पाटील,  आदी उपस्थित होते.

बैलासाठी पेंड, भुशाची सुविधा

जोतिबा यात्रेसाठी बैलगाडीतून भाविक येतात. सहजसेवा ट्रस्टर्फे,बैलांसाठी शेंगदाणा, पेंड व भुसा दिला जातो. यंदाही तशी सुविधा उपलब्ध केली असल्याचे ट्स्टतर्फे सांगण्यात आले. दरम्यान भाविकांच्या सोयीसाठी पोलिस प्रशासनातर्फे, गायमुख येथे अन्नछत्राच्या शेजारीला जागेत तीन हजार चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes