डॉ.. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा
schedule24 Mar 26 person by visibility 30 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठवडगाव वाणिज्य विभाग व परभन्ना फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय कार्यशाळा झाली. पुणे येथील ऍग्रो टुरिझमचे संचालक गणेश चप्पलवार यांनी मार्गदर्शन केले. कृषी पर्यटन क्षेत्रातील भविष्यातील संधी ,अडचणी,व्यवसाय व्यवस्थापन करण्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर गोष्टींचे मार्गदर्शन व शासनाचे धोरण व सवलती, सबसीडी मार्गदर्शन आणि शेतीचे रूपांतर पर्यटनात करताना त्या व्यवसायाची ओळख निर्माण केली पाहिजे. प्रत्येक कृषी पर्यटन एक ब्रँन्ड म्हणून नावारूपाला कसे आणले पाहिजे. त्यासाठी शेतक-यांनी आपले बलस्थाने ओळखून उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून आपली वेगळी ओळख निर्माण करता येईन असे सांगितले. त्यासोबत प्रा. शिवकांत पुपलवाड यांनी कृषी पर्यटन क्षेत्रातील आर्थिक बाबी येणाऱ्या अडचणी यासंबंधी मार्गदर्शन केले. पन्हाळा कृषी पर्यटन केंद्र संचालक राजेंद्र सुतार यांनी कृषी पर्यटन केंद्र चालवताना येणाऱ्या संधी संबंधित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर डिसले हे होते. संस्थेचे संचालक प्रा. प्रमिला माने यांची प्रमुख उपस्थिती होती. वाणिज्य विभाग प्रमुख प्रा सुनीता अमृतसागर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रा. सर्जेराव पद्माकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शिवकांत पुपलवाड यांनी आभार मानले.