Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर सराफ सुवर्णकार संघाचा शनिवारी जिल्हास्तरीय मेळावादहा गावांच्या समावेशासह हद्दवाढीस सर्वांची संमती : नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळडॉ.. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा कोल्हापुरात तीन एप्रिलला सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरणघोषवाक्य स्पर्धेत मुख्याध्यापक संजय सौंदलगे राज्यात प्रथमजिल्हा परिषदेत शहिदांना अभिवादन कळंबा फिल्टर हाऊसच्या दुरावस्थेबाबत कृती समिती आक्रमकविद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी जिद्द- चिकाटी- शिस्त व आत्मविश्वास या चतुःसूत्रीचा वापर करावाहसन मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर सामाजिक उपक्रम दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता कमी - शरद पवार गटाचे निरीक्षक विकास लवंडे

जाहिरात

 

कोल्हापूर सराफ सुवर्णकार संघाचा शनिवारी जिल्हास्तरीय मेळावा

schedule25 Mar 26 person by visibility 84 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : सराफ आणि सुवर्ण कारागीर यांच्या हितासाठी कोल्हापूर जिल्हा सराफ सुवर्णकार संघ गेली पंधरा वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत आहे. या संघाच्या वतीने 28 मार्च 2026 रोजी सराफ सुवर्ण कारागिरांचा जिल्हास्तरीय मेळावा  कोल्हापुरात आयोजित केला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष आणि सराफ अमोल ढणाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मेळाव्यात सराफ आणि सुवर्णक कारागीर यांच्यासमोर असणाऱ्या अडचणी, त्यावर केल्या जाणाऱ्या उपाययोजना यासह विविध विषयावर विचारमंथन होणार आहे असे ढणाल यांनी सांगितलं.

 सकाळी 11 ते 2 या वेळेत  मेळावा होत आहे. मार्केट यार्डातील लोटस बँक्वेट हॉलमध्ये हा मेळावा होणार आहे मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाशिकचे नामवंत सराफ अनिल दंडे आणि सुरेंद्र पुरवंत हे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात सराफ सुवर्णकारागीर यांच्यासमोर सध्या भेडसावत असणाऱ्या अडचणी, सोने-चांदी दरात दररोज होत असलेली वाढ, सराफ व्यवसायिकांच्या वर होत असणारे प्राण घातक हल्ले आणि चोऱ्या नामवंत सराफ पेढ्यांच कोल्हापुरात आगमन झाल्यापासून अडचणीत आलेले छोटे व्यावसायिक या सर्वच विषयावर चर्चा होणार आहे. यातून मेळाव्यात मंजूर केलेले ठराव केंद्र आणि राज्य सरकारकडे अंमलबजावणीसाठी पाठवले जाणार आहेत. स्टॉक मॅनेजमेंट, नव्या आर्थिक वर्षाचे नियोजन वर सुद्धा मेळाव्यात चर्चा होणार आहे असं अमोल ढणाल यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला पांडुरंग कुंभार, अमर गोडबोले, अविनाश मुखरे सचिन देवरुखकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes