शालेय फुटबॉल स्पर्धत विवेकानंद कॉलेज अजिंक्य
schedule25 Sep 23 person by visibility 542 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या फुटबॉल मैदानावर झालेल्या शहरस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १९ वयोगट मुलींच्या गटात विवेकानंद कॉलेजने अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात विवेकानंदने पोद्दार इंटरनॅशनल स्कूल संघाचा १-० असा पराभव केला.
जिल्हा क्रीडा कार्यालय आणि कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. १९ वर्षाखालील मुली अंतिम सामनाविवेकानंद कॉलेज विजय विरुद्ध पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाला. विवेकानंदकॉलेज कडून निदा सत्तारमेकर एक गोल केला. विजय संघातील खेळाडू : ध्रुवी पटेल,धनश्री गवळी, श्रावस्ती कोल्हटकर, सई चाळके, सौम्या कागले, निदा सत्तारमेकर, गायत्री धुंदरे, रचना आयरे, आरती देसाई, महेक नदाफ, निकिता मगदूम, मैत्री पाटील, सई शिंदे, सिद्धी कांबळे,रितू पाटील, अपर्णा हरिहर क्रीडा शिक्षक प्रा. संतोष कुंडले
बक्षीस वितरण महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी विजय माळी शैक्षणिक पर्यवेक्षक प्राथमिक शिक्षण समिती, आशिष मांडवकर सामाजिक कार्यकर्ते, सचिन पांडव क्रीडा निरीक्षक, प्रदीप साळोखे उपस्थित होते. स्पर्धा नियोजन सचिन पांडव क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, सुरेश चव्हाण यांनी केले.विजयी व उपविजयी संघास सामाजिक कार्यकर्ते आशिष मांडवकर यांचेकडून ट्रॉफी देण्यात आली.