
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : चेन्नई येथे झालेल्या 'पॅरा ओपन टेबल टेनिस २०२२' नॅशनल स्पर्धेत विवेक मोरेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. आतापर्यंत टेबल टेनिस या खेळात दिव्यांग विभागात त्याने दोन आंतरराष्ट्रीय, 10 राष्ट्रीय, चार राज्य तसेच ३ वेळा जिल्हा पातळीवर प्रतिनिधीत्व केले आहे. २०१७ मध्ये जॉर्डन येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने कांस्य पदक मिळवलेले आहे तर २०१८ मध्ये थायलंड येथील स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेले आहे. आता जागतिक मानांकन मिळवण्याचे त्याचे ध्येय आहे.