Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिप अध्यक्ष - उपाध्यक्षांची नावे निश्चित ! शिल्पा खोत, तानाजी पाटलांना संधी! जिप सदस्य अरुण जाधव यांच्या विरोधात जिल्हा कोर्टात याचिकाबुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, यंदाची सर्वाधिक बक्षिसाची मोठी स्पर्धा कोरे अभियांत्रिकीच्या एनसीसी विभागाकडून रांगणा किल्ले पदभ्रमंतीडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दहा पुरस्कारकरवीर गर्जनातर्फे गुढीपाडव्यादिवशी शोभायात्राकाँग्रेसने थाटली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल, गॅस दरवाढ –तुटवडावरोधात आंदोलनकोल्हापूर भाजपतर्फे राहुल गांधीच्या निषेधार्थ शिवाजी चौकात निदर्शने  किडनीच्या आरोग्यासाठी समतोल आहार-नियमित व्यायामाची गरज - डॉ विश्वनाथ मगदूम  महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित, अध्यक्ष-उपाध्यक्षपद सव्वा वर्षासाठी !  पाच वर्षात ४ अध्यक्ष-उपाध्यक्ष, २० सभापती ! !

जाहिरात

 

जिप अध्यक्ष - उपाध्यक्षांची नावे निश्चित ! शिल्पा खोत, तानाजी पाटलांना संधी!

schedule17 Mar 26 person by visibility 565 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाच्या सदस्या शिल्पा शशिकांत खोत तर उपाध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे गडमुडशिंगी मतदारसंघातील सदस्य तानाजी पाटील यांची नावे निश्चित केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. गेले काही दिवस अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागले होते. अध्यक्षपद कोणाला यावरुनही भाजप व राष्ट्रवादीत घमासान सुरू होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यत हा विषय पोहोचला होता.

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड मंगळवारी, १७ मार्च २०२६ रोजी होत आहे. जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ६८ आहे. महायुतीचे संख्याबळ ५१ पर्यंत पोहोचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वीस सदस्य आहेत. भाजपचे बारा सदस्य आहेत. शिवसेनेचे नऊ सदस्य आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाची सदस्य संख्या सहा इतकी आहे. तर राजर्षी शाहू आघाडीचे चार सदस्य आहेत. काँग्रेसची सदस्य संख्या पंधरा इतकी आहे. अध्यक्षपदावरुन भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू होती. दोन्ही पक्षाकडून पहिल्यांदा आमचाच अध्यक्ष होणार असा दावा केला जात होता. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या आदल्या दिवशी अर्थात सोमवारी, सोळा मार्च रोजी सगळे सदस्य पन्हाळा येथे पाठविण्यात आले. मंगळवारी सकाळी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची नावे कळविली जातील असे ठरले. अध्यक्षपदासाठी  कागल तालुक्यातील सेनापती कापशी मतदारसंघातील राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या शिल्पा शशिकांत खोत यांचे नाव निश्चित केल्याचे वृत्त आहे. उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. पाटील हे भाजपकडून गडमुडशिंगी मतदारसंघातून निवडून आले आहेत.

दरम्यान अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे याच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी सभा होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes