Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जुनी पेन्शनसाठी शुक्रवारपासून आंदोलन, शैक्षणिक व्यासपीठ - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जिप अध्यक्ष- उपाध्यक्षपदी शिल्पा खोत, तानाजी पाटील बिनविरोध! काँग्रेसची माघार!!माजी विद्यार्थ्याने मिळवले यूपीएससीत यश, शाळेने केले मिरवणुकीद्वारे जल्लोषी स्वागतजिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेस लढविणार, अर्ज दाखलजरगनगर विद्यामंदिर बनली हायटेक शाळा, अत्याधुनिक लॅबची राज्यात महापालिकेची पहिलीच शाळाजिप अध्यक्ष - उपाध्यक्षांची नावे निश्चित ! शिल्पा खोत, तानाजी पाटलांना संधी! जिप सदस्य अरुण जाधव यांच्या विरोधात जिल्हा कोर्टात याचिकाबुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, यंदाची सर्वाधिक बक्षिसाची मोठी स्पर्धा कोरे अभियांत्रिकीच्या एनसीसी विभागाकडून रांगणा किल्ले पदभ्रमंतीडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दहा पुरस्कार

जाहिरात

 

जुनी पेन्शनसाठी शुक्रवारपासून आंदोलन, शैक्षणिक व्यासपीठ - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा

schedule17 Mar 26 person by visibility 35 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर  : १९८२ ची जुनी पेन्शन मिळणेसाठी शुक्रवार  २० मार्च रोजी होणाऱ्या आमरण उपोषणास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांनी पाठींबा देण्याचा निर्णय आज रोजी  विद्याभवन कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत  घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड होते. या बैठकीस  मार्गदर्शन शिक्षक नेते दादा लाड यांनी केले.

    १९८२ ची जुनी पेन्शन योजना मिळणेसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर गेली १५ दिवस आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून शुक्रवार २० मार्च रोजी पासून साखळी अमरण उपोषण सुरू केले जाणार आहे.  उपोषणास सुदेश जाधव व राजाराम कोठावळे यांच्या पासून सुरुवात केली जाणार आहे. या दिवशी दुपारी २.३० वाजता  उपोषणाला पाठिबा देऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी महावीर गार्डनमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने करण्यात आले.
    या बैठकीस चेअरमन राहूल पवार, सचिव आर. वाय. पाटील, व्हा. चेअरमन रवींद्र मोरे, सुधाकर निर्मळे, श्रीकांत पाटील, सागर चुडाप्पा, राजेश वरक, शिवाजी कोरवी, प्राचार्य सचिन कोंडेकर, प्रकाश स्वामी, शिवाजी माळकर, अशोक पाटील, मनोहर पाटील, दत्तात्रय जाधव आदी  उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes