जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेस लढविणार, अर्ज दाखल
schedule17 Mar 26 person by visibility 184 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेस लढविणार आहे. काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी सदस्या रसिका अमर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर उपाध्यक्षपदासाठी सदस्य संभाजी पाटणकर हे उमेदवार आहेत. महायुतीकडून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सेनापती कापशी येथील सदस्या शिल्पा शशिकांत खोत तर उपाध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे गडमुडशिंगी मतदारसंघातील सदस्य तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ६८ इतकी आहे. यामध्ये महायुतीची सदस्य संख्या ५१ तर काँग्रेसची सदस्य संख्या १५ इतकी आहे. मंगळवारी, १७ मार्च रोजी दुपारी दोन वाजता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी सभा होत आहे. सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. दुपारी सभेला सुरुवात झाल्यानंतर अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटाचा कालावधी आहे.