Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळतर्फे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण, शेतकऱ्यांना होणार थेट लाभजिपचे पदाधिकारी, पंचायत समिती सभापतीसाठी नवीन वाहन, अंदाजपत्रकात चार कोटीची तरतूदजुनी पेन्शनसाठी शुक्रवारपासून आंदोलन, शैक्षणिक व्यासपीठ - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जिप अध्यक्ष- उपाध्यक्षपदी शिल्पा खोत, तानाजी पाटील बिनविरोध! काँग्रेसची माघार!!माजी विद्यार्थ्याने मिळवले यूपीएससीत यश, शाळेने केले मिरवणुकीद्वारे जल्लोषी स्वागतजिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेस लढविणार, अर्ज दाखलजरगनगर विद्यामंदिर बनली हायटेक शाळा, अत्याधुनिक लॅबची राज्यात महापालिकेची पहिलीच शाळाजिप अध्यक्ष - उपाध्यक्षांची नावे निश्चित ! शिल्पा खोत, तानाजी पाटलांना संधी! जिप सदस्य अरुण जाधव यांच्या विरोधात जिल्हा कोर्टात याचिकाबुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, यंदाची सर्वाधिक बक्षिसाची मोठी स्पर्धा

जाहिरात

 

गोकुळतर्फे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण, शेतकऱ्यांना होणार थेट लाभ

schedule18 Mar 26 person by visibility 16 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दुग्ध व्यवसाय आणि पशुधन व्यवस्थापन क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. नेदरलँड्समधील  प्रोजेक्ट आउट सेंडर मॅनेजर या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने गोकुळ दूध संघातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी दहा दिवसांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.

 प्रशिक्षणासाठी नेदरलँड्सचे अनुभवी पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. एर्विन द. विथ यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते विकास कक्ष, ताराबाई पार्क येथे डॉ. विथ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अजित नरके, प्रकाश पाटील उपस्थित होते.

          गोकुळ संघाने पी.यू.एम. संस्था नेदरलँड्स सोबत १८ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२७ या दोन वर्षाच्या कालावधीसाठी सहकार्य (फ्रेमवर्क) करार केला असून या करारानुसार दर दोन महिन्यांनी विविध विषयांतील तज्ज्ञ गोकुळ संघात येऊन मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे गोकुळच्या पशुवैद्यकीय पशुपालन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शन मिळणार आहे. करारातंर्गत पहिल्या टप्प्यातील जनावरांची दूध उत्पादकता वाढविणे व गोठा व्यवस्थापन या विषयी ६  ते १७ मार्च २०२६ या कालावधीत प्रशिक्षणाचे आयोजन स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर प्रशिक्षण केंद्र, ताराबाई पार्क येथे पार पडले. प्रशिक्षणात संघातील ४३ पशुवैद्यकीय अधिकारी सहभागी होते.     

 पुढील दोन वर्षांच्या कालावधीत या कराराअंतर्गत पशुधन व्यवस्थापन, प्रजनन क्षमता सुधारणा, जनावरांचे आरोग्य, खाद्य व चारा व्यवस्थापन तसेच विपणन व धोरणात्मक नियोजन या विषयांवरही पी.यू.एम.कडून तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. गोकुळचे चेअरमन मुश्रीफ म्हणाले, गोकुळचे पशुवैद्यकीय क्षेत्रातील कामकाज, शिस्तबद्ध सेवा आणि शेतकऱ्यांशी असलेली बांधिलकी पाहूनच नेदरलँड्समधील पी.यू.एम. या संस्थेने गोकुळची निवड केली, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. याप्रसंगी कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.प्रकाश साळुंखे, डॉ.दयावर्धन कामत, डॉ.प्रकाश दळवी, डॉ.तानाजी कडवेकर, डॉ.सुभाष गोरे, डॉ.रणजीत चोपडे,जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes