माजी विद्यार्थ्याने मिळवले यूपीएससीत यश, शाळेने केले मिरवणुकीद्वारे जल्लोषी स्वागत
schedule17 Mar 26 person by visibility 43 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ज केंद्रीय लोकसेवा आयोगच्या परीक्षेत ३४९ वी रँक प्राप्त करून उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल माजी विद्यार्थी हर्षवर्धन पाटील यांचा जुना बुधवार पेठेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी शाळेतर्फे पाटील यांची मिरवणुकीद्वारे जल्लोषी स्वागत करण्यात आले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोल्हापूर विभागप्रमुख डॉ. श्रीराम साळुंखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्याहस्ते यूपीएससी परीक्षेत यश मिळवल्याबद्दल हर्षवर्धन पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल श्रीराम साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यालंकार भवन शेळेवाडी चे मुख्याध्यापक सातपुते, पुरुषोत्तम साळुंखे व वडील हरिश्चंद्र पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी परिश्रम व त्याग करण्याची प्रेरणा दिली. अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे कार्याध्यक्ष साळुंखे यांनी 'उठा जागे व्हा व ध्येय प्राप्त करेपर्यंत थांबू नका' असा संदेश दिला. मुख्याध्यापक बी.जे.सावंत यांनी आभार मानले. ए.के. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.