जिप अध्यक्ष- उपाध्यक्षपदी शिल्पा खोत, तानाजी पाटील बिनविरोध! काँग्रेसची माघार!!
schedule17 Mar 26 person by visibility 682 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिल्पा शशिकांत खोत तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष -उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली त्यामुळे या दोन्ही निवडी बिननिरोप झाल्या. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी 17 मार्च 2026 रोजी जिल्हा परिषद सदस्यांची विशेष सभा झाली.
68 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये महायुतीचे संख्याबळ 51 इतके आहे. अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सदस्य शिल्पा शशिकांत खोत व उपाध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे सदस्य तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर विरोधी काँग्रेस आघाडीकडून अध्यक्षपदासाठी रसिका अमर पाटील तर उपाध्यक्षपदासाठी संभाजी पाटणकर यांची उमेदवारी अर्ज होते. सकाळी 10 ते 12 यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी येडगे यांनी अध्यक्षपदासाठी दोन अर्ज तर उपाध्यक्षपदासाठी दोन अर्ज प्राप्त आहेत. दोन्ही पदासाठीचे अर्ज वैध ठरल्याचे त्यांनी सांगितले. दुपारी दोन वाजून १६ मिनिट ते दोन वाजून 31 मिनिटापर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी, " विरोधी काँग्रेस आघाडीला अध्यक्ष - उपाध्यक्षपदाचे उमेदवारी अर्ज मागे घेऊन सहकार्य करावे. निवडणूक बिनविरोध करून वेगळा आदर्श निर्माण करावा आणि विकासात्मक वाटचाल साऱ्यांनी मिळून करू या असे त्यांनी आवाहन केले. सत्ताधारी आघाडीच्या या आवाहनाला प्रतिसाद देत विरोधी काँग्रेस आघाडीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेतली. यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सेनापती कापशी येथील शिल्पा शशिकांत खोत यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी गडमुडशिगी येथील तानाजी पाटील यांची निवड झाली. निवडीनंतर नूतन अध्यक्ष खोत व उपाध्यक्ष पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी आदींच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार झाला.यानंतर जिल्हा परिषद सदस्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.