Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिप सदस्य अरुण जाधव यांच्या विरोधात जिल्हा कोर्टात याचिकाबुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, यंदाची सर्वाधिक बक्षिसाची मोठी स्पर्धा कोरे अभियांत्रिकीच्या एनसीसी विभागाकडून रांगणा किल्ले पदभ्रमंतीडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दहा पुरस्कारकरवीर गर्जनातर्फे गुढीपाडव्यादिवशी शोभायात्राकाँग्रेसने थाटली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल, गॅस दरवाढ –तुटवडावरोधात आंदोलनकोल्हापूर भाजपतर्फे राहुल गांधीच्या निषेधार्थ शिवाजी चौकात निदर्शने  किडनीच्या आरोग्यासाठी समतोल आहार-नियमित व्यायामाची गरज - डॉ विश्वनाथ मगदूम  महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित, अध्यक्ष-उपाध्यक्षपद सव्वा वर्षासाठी !  पाच वर्षात ४ अध्यक्ष-उपाध्यक्ष, २० सभापती ! !गोकुळच्या कार्यक्रमात सतेज पाटलांची राजकीय टोलेबाजी, मुश्रीफ-नरकेंच्या उपस्थितीत महाडिकांना डिवचले ! आबिटकर, कोरे कार्यक्रमाला अनुपस्थित ! !

जाहिरात

 

जिप सदस्य अरुण जाधव यांच्या विरोधात जिल्हा कोर्टात याचिका

schedule16 Mar 26 person by visibility 448 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे सदस्य अरुण मारुती जाधव यांच्या विरोधात जिल्हा कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुनील हिंदुराव चौगले व तळाशी येथील नागरिक रवींद्र भीमराव जाधव यांनी जिल्हा न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकेवर सोमवारी, १६ जानेवारी  होणारी सुनावणी झाली नाही. पुढील सुनावणी २५ मार्च २०२६ रोजी  होणार आहे.

कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुनील चौगले, रवींद्र जाधव व त्यांचे वकील गोरुले यांनी यासंदर्भातील माहिती दिली. ते म्हणाले, ‘ अरुण जाधव यांना फौजदारी गुन्हयामध्ये सात वर्षाची शिक्षा झाली होती. दरम्यान त्यांनी हायकोर्टात या शिक्षेविरुद्ध आव्हान दिले होते. हायकोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही. सध्या ते जामीनावर सुटलेले आहेत. दरम्यान जाधव यांनी निवडणूक अर्जामध्ये त्यांच्यावरील गुन्हयांची माहिती लपविलेली आहे. तेजिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चे कलम सोळा एक ब नुसार निवडणूक  लढविण्यास, तसेच पदावर राहण्यास अपात्र आहेत. तेव्हा त्यांना जिल्हा परिषद कामकाजापासून अलिप्त ठेवावे अशी अंतरिम मागणी केली आहे. जिल्हा कोर्टाने जाधव यांना त्यांचे म्हणणे सादर करण्यासंबंधी नोटीस बजावली आहे.’ 

दरम्यान या याचिकेसंबंधी  जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘निवडणूक अर्ज सादर करताना सगळी माहिती भरलेली आहे. मी कोणत्याही प्रकारची माहिती लपविली नाही. माझ्यासंबंधी हा जो आरोप केला आहे, तो खोटा आहे.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes