ज्येष्ठ फुटबॉलपटू यशवंत कातवरे यांचे निधन
schedule21 Jun 24 person by visibility 524 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील जुन्या शाहूपुरी फुटबॉल संघाचे जेष्ठ खेळाडू यशवंत कातवरे (वय ८७) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. शाहुपुरीतील शाहुपुरी फुटबॉल संघ काही वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. या संघाचं एक वैशिष्ट्य हे होतं की या संघात एकाच वेळी पिता-पुत्र संघाकडून खेळत होते. यशवंत कातवरे आणि त्यांचे पुत्र दीपक कातवरे यांनी अंदाजे दहा वर्षाच्या आसपास एकत्र शाहुपुरी संघाकडून खेळ केला आहे. यशवंत कातवरे हे तर वयाच्या ५५ वर्षापर्यंत खेळत होते. ज्या वयात बरेचजण आध्यात्मिक गोष्टींकरता जास्त वेळ घालवतात त्या वयात यशवंत कातवरे हे शाहुपुरी संघाचे कीट परिधान करुन छत्रपती शाहू स्टेडियमवर सामन्याकरता हजर असायचे. बचावफळीत खेळत असताना सर्व खेळाडूंच्या हालचालींवर त्यांचं बारीक लक्ष असे. त्यांच्या निधनाने ज्येष्ठ खेळाडू हरपला अशी प्रतिक्रिया फुटबॉल खेळाडूंच्यातून व्यक्त केली जात आहे.