Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एकाच शाळेला दोन कोटी, इतर शाळांसाठी किती निधी ? शिक्षण विभागाच्या असमान निधी वाटपावरुन स्थायी गाजलीमाजी महापौर महादेवराव आडगुळे यांच्या नातवाची आत्महत्यापुरोगामी शिक्षक -समविचारी संघटनेतर्फे सोमवारी धरणे आंदोलनऑनलाइन संचमान्यतेच्या विरोधात घुमला पाच जिल्ह्यातील शिक्षकांचा आवाज, शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर संघटित शक्तीचे दर्शनकोल्हापुरात शुक्रवारी रंगणार प्रिय शिरीष मैफल, विश्वजीत बोरवणकर, पारुल मिश्रांचे सादरीकरणहिल रायडर्सची यंदा अमृतमहोत्सवी पन्हाळा - पावनखिंड पदभ्रमंती मोहीम, चार जुलैला सुरुवातब्राह्मण पुरोहित संघातर्फे पुरस्कार वितरण, विद्यार्थ्यांचा गुणगौरवपुण्यात स्वतंत्र चित्रनगरीसाठी महामंडळ करणार सरकारकडे पाठपुरावा, फेब्रुवारीत मराठी चित्रपट संमेलनअजय पवार नवे अपर जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाणांची बदलीबांधकाम प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन, कसबा बावड्याच्या लेकीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान

जाहिरात

 

वीरशैव बँकेचे अध्यक्ष सदानंद हत्तरकी यांचे निधन

schedule03 Apr 24 person by visibility 1024 categoryसामाजिक

वीरशैव बँकेचे अध्यक्ष सदानंद हत्तरकी यांचे निधन
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील वीरशैव को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सदानंद राजकुमार हत्तरकी यांचे बुधवारी (तीन एप्रिल) निधन झाले. मृत्यूसमयी ते ५० वर्षाचे होते. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याचे ते संचालक होते. गोकुळचे माजी चेअरमन राजकुमार हत्तरकी व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखा हत्तरकी यांचे ते चिरंजीव होते. 
सदानंद हत्तकरी हे विविध सामाजिक संघटनांशी निगडीत होते. त्यांची शांत व संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळख होती. हलकर्णी विद्या प्रसारक मंडळाचे ते सर्वेसर्वा होते.  त्यांची नोव्हेंबर २०२३ मध्ये वीरशैव बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. दरम्यान गेले आठ दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. बेळगाव येथील केएलई हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले. हलकर्णी येथे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने गडहिंग्लज तालुक्यातील उमदे व आश्वासक नेतृत्व हरपले अशा शब्दांत शोक व्यक्त होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes