Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण यययणण ततअनुसूचित जाती आरक्षण बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत वेदा माळीला शंभरपैकी शंभर गुण, देशात अव्वल नगरसेविका, महिला अधिकारी क्रिकेटच्या मैदानावर! शिक्षिकेनही लुटला खेळाचा आनंद ! !महापालिकेतील रिक्त जागांच्या भरतीप्रश्नी काँग्रेस आक्रमक, गुरुवारपासून साखळी उपोषणशहर स्वच्छतेसाठी कोल्हापूर फर्स्टचे पाऊल, महापालिकेला दिल्या चार स्विपिंग मशिन्सस्त्रियाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिक भागीदारी मिळणे आवश्यक : डॉ. मीना शेंडकरकॉमर्स कॉलेजच्या तीस विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांकडून विकासशुल्क- शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास कॉलेजवर कारवाई

जाहिरात

 

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत वेदा माळीला शंभरपैकी शंभर गुण, देशात अव्वल

schedule09 Mar 26 person by visibility 196 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जानेवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत इयत्ता तिसरीच्या वर्गात मराठी माध्यमामध्ये श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरातील विद्यार्थिनी वेदा दुंडाप्पा माळी हिने शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत. कोरेगाव येथील गौरांगी प्रशांत काजवेने ९९ गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर जरगनगर विद्यामंदिरातील सर्वेषु ज्ञानेश्वर वागरेने ९९ गुण मिळवले आहेत. वेदा माळी ही देशात सर्वाधिक गुण मिळवणारी विद्यार्थिनी ठरल्याचे शाळेने म्हटले आहे. गणित, बुद्धिमत्ता आणि सायन्स या विषयावर आधारित ही परीक्षा असते.  

दरम्यान या परीक्षेत जरगनगर विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. गोल्ड मेडल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वेदा दूंडाप्पा माळी 100 गुण, सर्वेषु ज्ञानेश्वर वागरे 99, जान्हवी जालंदर पोवार 97, जय राहुल महाजन 97, विश्वा प्रदीप लांडगे 96, प्रभास सागर मेढे 95, नमित गणेश कांबळे 95, हर्षराज विनोद सुतार 95, ओजस्विता प्रवीण पुजारी 95, श्रेया देवानंद ढेकळे 94 यांचा समावेश आहे.

सिल्व्हर मेडल प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये कीर्ती पंकज कदम , यश गजेंद्र सावंत , राही अमोल भोसले, रिद्धी सागर पाटील , शिवन्या सुयोग सावंत , स्वरा प्रभाकर भोये , वेदिका संदीप संकपाळ , गौरव कुमार शिंदे , ओम संजय कदम, सार्थक स्वप्नील पारिसवाडकर, अनुश्री नागेश पाटील, स्मृती सुमित सुतार, प्रज्वल कृणाल आयरेकर,  अनुज राहुल पाटील, प्रज्ञा केतन पालनकर , रुद्र राहुल चौगले, स्वरा किरण मठपती यांचा समावेश आहे. ब्राँझ मेडल प्राप्त विद्यार्थी बारा आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षिका पुष्पा सुभाष गायकवाड यांचे मार्गर्शन तर मुख्याध्यापिका नीता दिलीप ठोंबरे यांची प्रेरणा मिळाली.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes