Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
तण तथनगरसेविका, महिला अधिकारी क्रिकेटच्या मैदानावर! शिक्षिकेनही लुटला खेळाचा आनंद ! !महापालिकेतील रिक्त जागांच्या भरतीप्रश्नी काँग्रेस आक्रमक, गुरुवारपासून साखळी उपोषणशहर स्वच्छतेसाठी कोल्हापूर फर्स्टचे पाऊल, महापालिकेला दिल्या चार स्विपिंग मशिन्सस्त्रियाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिक भागीदारी मिळणे आवश्यक : डॉ. मीना शेंडकरकॉमर्स कॉलेजच्या तीस विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांकडून विकासशुल्क- शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास कॉलेजवर कारवाईकोल्हापूर फर्स्टचा सोमवारी वर्धापनदिन, महापालिकेस करणार स्विपींग मशिन प्रदानगोकुळमध्ये महिला दिनानिमित्त विविध उपक्रम वूमेन इन लीडरशिप कार्यक्रमात उलगडली स्त्रीशक्तीची कर्तबगारी

जाहिरात

 

शहर स्वच्छतेसाठी कोल्हापूर फर्स्टचे पाऊल, महापालिकेला दिल्या चार स्विपिंग मशिन्स

schedule09 Mar 26 person by visibility 110 categoryउद्योग

 
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शहराच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या कोल्हापूर फर्स्ट संस्थेच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त “स्वच्छ-सुंदर कोल्हापूर” या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. रेसिडेन्सी क्लब येथील झालेल्या कार्यक्रमात शहरातील स्वच्छता व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेला चार स्विपिंग मशिन्स सुपूर्द करण्यात आल्या, तसेच सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणी उपक्रमाची घोषणा करण्यात आली.

प्रारंभी कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक सुरेंद्र जैन यांनी, ‘ कोल्हापूर फर्स्टच्या माध्यमातून शहर आणि जिल्हयाच्या विकासाला गती देण्यासाठी प्रशासनापासून लोकप्रतिनिधीपर्यंत पाठपुरावा करण्यात येतो. लोकांना सामावून घेत शहर विकासाच्या उपक्रमांना चालना दिली आहे.  कोल्हापूरच्या विकासामध्ये महिला नेतृत्वाची मोठी भूमिका राहणार असून महिला शक्तीमुळे शहराचा विकास अधिक गतिमान होईल. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी चार स्विपिंग मशिन्स महापालिकेला प्रदान केल्या. पुढील काळातही टप्प्याटप्प्याने जेवढी स्विपिंग मशिन्स देऊ. आज सहा सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणीची घोषणा करण्यात आली आहे. भविष्यात त्यामध्ये आणखी वाढ करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

शहर स्वच्छतेसाठी स्विपिंग मशिनची उपलब्धता व सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणी करुन देणारे कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन, सचिन मेनन, भरत जाधव, नितीन वाडीकर, जे.के.शहा, शंकर दुलहानी व डॉ.गिरीष वझे यांचा महापौर व आयुक्त यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी कोल्हापूर फर्स्टच्या उपक्रमांचे कौतुक करताना शहर विकासासाठी विविध प्रकल्प राबविले जात असल्याचे सांगितले. महापौर निकम म्हणाल्या की, कोल्हापूरच्या प्रवेशद्वारांवर शहराची वैशिष्ट्ये दर्शविणारी आयलँड उभारण्याचा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसेच शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कोल्हापूर फर्स्टमध्ये एकूण २२ संस्था संलग्न असून शाश्वत विकासासाठी एकत्रित प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमामध्ये कोल्हापूर प्रेस क्लब संस्थेचाही समावेश झाल्याबद्दल प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे व पत्रकारांचे स्वागत करण्यात आले.  कार्यक्रमाला कोल्हापूर फर्स्टचे उपाध्यक्ष डॉ. अमोल कोडोलीकर, प्रताप पाटील, जयदीप पाटील, पद्मसिंह पाटील, इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष व कारखानदार कमलाकांत कुलकर्णी, प्रसन्न तेरदाळकर, जयदीप चौगले, भरत जाधव, बदाम पाटील, मोहन कुशिरे,  हरिश्चंद्र धोत्रे, राहुल पाटील, सतीश कडुकर,  शैलेश शिंदे,  सचिन सानबाग, आशिष सेवेकरी, विनोद कांबुज, अजय कोराने, के. आय. टी. चे साजिद हुदली, कोल्हापूर फर्स्टचे विशेष निमंत्रित सदस्य नेमचंद संघवी, बापू कोंडेकर, विज्ञानंद बेडेकर, सतीश घाटगे, ऋतुराज इंगळे, अश्विनी दानीगोंड, चारुदत्त जोशी, मनोज साळुंखे, यतीश शहा, श्रीरंग गायकवाड आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes