कॉमर्स कॉलेजच्या तीस विद्यार्थ्यांची निवड
schedule09 Mar 26 person by visibility 46 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या तीस विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कंपनीचा नुकताच रोजगार मेळावा झाला. त्यात एकूण १३५ विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. त्यातून 30 विद्यार्थ्यांची निवड झाली. यासाठी कॉमर्स कॉलेजने ट्रेंनिंगचे आयोजन केले होते. संस्थेच्या अध्यक्षा रजनी मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. रोनित खराडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.