Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण यययणण ततअनुसूचित जाती आरक्षण बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत वेदा माळीला शंभरपैकी शंभर गुण, देशात अव्वल नगरसेविका, महिला अधिकारी क्रिकेटच्या मैदानावर! शिक्षिकेनही लुटला खेळाचा आनंद ! !महापालिकेतील रिक्त जागांच्या भरतीप्रश्नी काँग्रेस आक्रमक, गुरुवारपासून साखळी उपोषणशहर स्वच्छतेसाठी कोल्हापूर फर्स्टचे पाऊल, महापालिकेला दिल्या चार स्विपिंग मशिन्सस्त्रियाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिक भागीदारी मिळणे आवश्यक : डॉ. मीना शेंडकरकॉमर्स कॉलेजच्या तीस विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांकडून विकासशुल्क- शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास कॉलेजवर कारवाई

जाहिरात

 

अनुसूचित जाती आरक्षण बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

schedule10 Mar 26 person by visibility 15 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या मतदारसंघात खोटे जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढविणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी कोल्हापुरात सोमवारी, ९ मार्च २०२६ मोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जाती आरक्षण बचाव समितीतर्फे या मोर्चाचे आयोजन केले होते.बिंदू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले. यामध्ये ‘पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील सदस्य महेश पाटील, इचलकरंजी महापालिकेच्या नगरसेविका अलका स्वामी व गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ यांची जातीची प्रमाणपत्रे खोटी आहेत. त्यांचे सदस्य रद्द करुन फौजदारी दाखल करावी. ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना खोटी जात प्रमाणपत्रे दिली, त्या अधिकाऱ्यांवरही फौजदारी दाखल व्हावी व खातेनिहाय चौकशी करावी’असे म्हटले आहे.

मोर्चामध्ये माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार सुजित मिणचेकर, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, प्रा. सुकुमार कांबळे, दगडू भास्कर, नगरसेवक दुर्वास कदम, माजी नगरसेवक शिवाजी कवाळे, सुभाष देसाई, लालासाहेब नाईक, विशाल देवकुळे, प्रेमानंद मौर्य, जनार्दन गायकवाड, बाळासाहेब भोसले, अब्राहम आवळे, दीपक खांडेकर, संतोष बिसुरे, बाजीराव नाईक, अमोल महापुरे, जयदीप माने यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. खोटे जात प्रमाणपत्र काढणाऱ्यांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. दरम्यान नगराध्यक्ष तुरबतमठ, जिल्हा परिषद सदस्य पाटील व नगरसेविका स्वामी यांनी ‘आपण सादर केलेले दाखले अधिकृत आहेत. आमचे जातीचे दाखले वैध आहेत.’असे म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes