आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
schedule30 May 23 person by visibility 237 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : डॉ.डी. वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त आणि आमदार ऋतुराज संजय पाटील यांचा वाढदिवस बुधवारी (३१ मे) विविध उपक्रमांनी साजरा होत आहे.
कोल्हापूर दक्षिणमधून २०१९ मध्ये सर्वात तरुण आमदार म्हणून ऋतुराज पाटील यांनी विधानसभेत प्रवेश केला. जनतेमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणारे आमदार म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
कोरोनाच्या संकटाच्या काळातही जनतेशी सतत संपर्कात राहून त्यांनी अडीअडचणी सोडवण्यात ते आघाडीवर होते. दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा सर्वसामावेशक विकासाचा ध्यास घेऊन कार्यरत आहेत. गांधीनगरसह तेरा गावातील पिण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ३४३ कोटी रुपयांची सुधारित गांधीनगर पाणी योजना त्यांनी मंजूर करून आणली आहे. तीन वर्षाच्या काळात कोट्यावधीची विकासकामे त्यांनी केली आहेत.
आमदार ऋतुराज पाटील यांचा बुधवारी वाढदिवस साजरा होत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आमदार पाटील सकाळी ९ ते बारा या कालावधीत अजिंक्यतारा कार्यालय येथे उपस्थित राहणार असून सायंकाळी सहा ते नऊ या कालावधीत डी. वाय. पाटील कॉलेज साळोखेनगर येथे ते नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारतील. दुपारच्या कालावधीत रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिर, बॅडमिंटन स्पर्धा, फळे वाटप यासह विविध उपक्रम होणार आहेत.