Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उदय सामंत म्हणाले, २०२९ मधील निवडणुकीत संजय मंडलिक हे लोकसभेचे उमेदवारवडगाव येथील मच्छीमार ठेकेदाराचा आत्मदहनाचा इशारासतेज चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ ! प्रॅक्टिस क्लब, वेताळमाळ तालीम विजयी !!छत्रपती शिवराय, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी रथोत्सव थाटातपतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी  अरुंधती महाडिक ! खासदार धनंजय महाडिकांना सहकाररत्न पुरस्कार !!राज्यातील २५ बडया अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या, कोल्हापूरला तीन नवीन अधिकारीकार्तिकेयन एस यांची बदली, कोल्हापूर जिप सीईओपदी डॉ. जस्मिन के. मंजुलक्ष्मी यांची बदली, महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारुड अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघण यांची तडकाफडकी बदलीमहापालिकेत नगरसेवक- अधिकाऱ्यांत खडाजंगी, आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेश

जाहिरात

 

उदय सामंत म्हणाले, २०२९ मधील निवडणुकीत संजय मंडलिक हे लोकसभेचे उमेदवार

schedule04 Apr 26 person by visibility 164 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : २०२९ मधील निवडणुका आम्ही महायुती म्ह्णूनच लढणार आहोत.  लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक हेच आमचे उमेदवार असतील.तर कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या तेरा जागा झाल्या तर शिवसेना किती जागा लढणार हा रणनितीचा भाग असेल असे शिवसेना नेते व उद्योगमंत्री उदय सामंती यांनी सांगितले.

कोल्हापूर येथील शिवसेना संपर्क कार्यालय येथे पक्ष संघटनच्या अनुषंगाने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोल्हापुरात शिवसेना भक्कम आहे. शिवसेनामुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमी प्रचाराची पहिली सभा कोल्हापुरात घ्यायचे. यामुळे येथे पक्षाची बांधणी जोरदार असायला हवी ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धारणा आहे. त्यादृष्टीने शिवसेनेची संघटनात्मक वाढीवर आमचा भर आहे. २०२९ मधील विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ वाढणार आहेत. आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. दरम्यान युती आणि जागा वाटपाचे निर्णय हे वरिष्ठ नेतेमंडळीच्या पातळीवर होत असतात.असेही सामंत यांनी सांगितले.

‘ भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री गणेश नाईक हे वरिष्ठ आहेत. त्याचवेळी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलण्याइतके मोठे नाहीत. स्वतची टीआरपी वाढविण्यासाठी नाईक हे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करतात. त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर द्यायला आमचा शाखा प्रमुख ही सक्षम आहे. मात्र वरिष्ठ नेत्यावर टीका करू नये ही शिवसेनेची शिकवण आहे.’असा टोलाही सामंत यांनी लगाविला. महाराष्ट्रातील जनतेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकजण शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असेही सामंत म्हणाले. भोंदू अशोक खरातला पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. त्यासारख्या प्रवृत्ती ठोकून काढली पाहिजे असेही सामंत म्हणाले.

पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, सुजित चव्हाण, शिवसेना जिल्हा समन्यवक सत्यजीत कदम, माझे जिल्हाप्रमुख विनायक साळोखे, शिवाजी जाधव, रणजीत जाधव, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, युवा सेनेचे पदाधिकारी व नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक शारंगधर देशमुख, रत्नेश शिरोळकर,  वैभव माने, स्वरुप कदम, हर्षल सुर्वे, कमलाकार जगदाळे, अंकुश निपाणीकर आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes