अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघण यांची तडकाफडकी बदली
schedule02 Apr 26 person by visibility 337 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील अपर जिल्हाधिकारी संजय शंकर शिंदे व जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. महसूल व वन विभागाचे उपसचिव महेश वरुडकर यांच्या सहीनिशी बदलीचे आदेश निघाले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांची सध्याच्या कार्यरत पदावरुन एकतर्फी कार्यमुक्ती करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. श्रीमती सिंघण यांनी अपर मुख्य सचिव (महसूल, नोंदणी व मुद्रांक), महसूल व वन विभाग मंत्रालय येथे रुजू व्हावे असे आदेश आहेत. अपर जिल्हाधिकारी शिंदे यानी अपर मुख्य सचिव महसूल व वन विभाग मंत्रालय येथे रुजू व्हावे असे आदेशात म्हटले आहे. गेली अनेक वर्षे एकाच जिल्ह्यात वेगवेगळया पदावर कार्यरत अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदली झाल्यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.