के. मंजुलक्ष्मी यांची बदली, महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारुड
schedule02 Apr 26 person by visibility 235 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची बदली झाली आहे. त्यांच्या बदलीने रिक्त् झालेल्या महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारुड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. भारुड हे सध्या राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान येथे प्रकल्प संचालक आहेत. त्यांची आता कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी बदलीचे आदेश काढले आहेत.तर के. मंजुलक्ष्मी यांची बदली अतिरिक्त आयुक्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे झाली.