Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उदय सामंत म्हणाले, २०२९ मधील निवडणुकीत संजय मंडलिक हे लोकसभेचे उमेदवारवडगाव येथील मच्छीमार ठेकेदाराचा आत्मदहनाचा इशारासतेज चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ ! प्रॅक्टिस क्लब, वेताळमाळ तालीम विजयी !!छत्रपती शिवराय, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी रथोत्सव थाटातपतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी  अरुंधती महाडिक ! खासदार धनंजय महाडिकांना सहकाररत्न पुरस्कार !!राज्यातील २५ बडया अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या, कोल्हापूरला तीन नवीन अधिकारीकार्तिकेयन एस यांची बदली, कोल्हापूर जिप सीईओपदी डॉ. जस्मिन के. मंजुलक्ष्मी यांची बदली, महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारुड अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघण यांची तडकाफडकी बदलीमहापालिकेत नगरसेवक- अधिकाऱ्यांत खडाजंगी, आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेश

जाहिरात

 

वडगाव येथील मच्छीमार ठेकेदाराचा आत्मदहनाचा इशारा

schedule04 Apr 26 person by visibility 168 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : पेठवडगाव येथील श्री महालक्ष्मी तलाव येथे मच्छ संगोपन व मच्छीमारीकरिता पंचवार्षिक ठेका मंजूर करुनही तिसऱ्या वर्षी मच्छीमारीसाठी जाणीवपूर्वक अडथळे आणले जात आहेत. नियम व अटीचे पालन करुनही हा ठेका रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यासंदर्भात वडगाव नगरपरिषदेकडे सातत्याने पाठपुरावा करुनही तिसऱ्या वर्षीचा वार्षिक ठेका रक्कम भरुन घेण्याास विलंब केला जात आहे. येत्या चौदा एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ववत ठेका मंजुरीस परवानगी दिली नाही तर त्याचदिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महदन करणार असल्याचा इशारा ठेकेदार बबन रणजीत पाटोळे यांनी दिला आहे. २४ जानेवारी २०२४ रोजी पंचवार्षिक ठेका मंजूर करण्यात आला. त्यानुसार २०२४- २५ व २०२५-२६ साठी प्रत्येक वर्षाचे एक लाख सत्तर हजार रुपये भरले आहेत. नियमानुसार सगळया प्रक्रिया पार पडल्या असताना २०२६ २७ चा वार्षिक ठेका भरुन घेण्यास अडथळे आणले जात आहेत.यामागे काही जणांचा कुटील डाव आहे. असा आरोपही त्यांनी केला. पत्रकार परिषदेवेळी अमोल महापुरे, दादासाहेब माने उपस्थित होते. दरम्यान यासंदर्भात वडगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes