Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघण यांची तडकाफडकी बदलीमहापालिकेत नगरसेवक- अधिकाऱ्यांत खडाजंगी, आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेशकेडीसीसी बँकेचा व्यवसाय २१ हजार ३७१ कोटींवर, ढोबळ नफा २८७ कोटीनालेसफाईचा सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करा - राजेश क्षीरसागर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे एक मुक्त विद्यापीठ, हसन मुश्रीफांची कोपरखळी शिवसेना ठाकरे गटाच्या शहर प्रमुखपदी  मंजीत माने, कोल्हापूर दक्षिण प्रमुखपदी विशाल देवकुळे चिन्मय मिशनचे स्वामी अभेदानंद यांची कोल्हापूरात व्याख्यानमालाग्रामीण भागालाही शहरांप्रमाणेच २५ दिवसांत गॅस सिलेंडर द्यावेत : खासदार धैर्यशील मानेशिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी २२ उमेदवार शर्यतीत ! शुक्रवारी - शनिवारी मुंबईत मुलाखती ! !१२०० प्राथमिक दूध संस्थासंदर्भात गोकुळची चौकशी, दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

जाहिरात

 

महापालिकेत नगरसेवक- अधिकाऱ्यांत खडाजंगी, आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेश

schedule02 Apr 26 person by visibility 215 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अपुरा पाणी पुरवठा, वाढीव बिले, घरफाळा याविषयासंबंधी आयोजित बैठकीत नगरसेवक आणि अधिकाऱ्यामध्ये खडाजंगीचा प्रकार घडला. पाणी पुरवठाविषयावरील चर्चेदरम्यान नगरसेवकांनी, शहर उपजल अभियंता रावसाहेब चव्हाण यांच्याविषयी गंभीर तक्रारी केल्या. प्लंबींग कामासाठी परवाना नूतनीकरण करताना प्लंबरकडून अधिकाऱ्याने प्रत्येकी एक हजार रुपये पैसे घेतल्याचे व तसे स्टेटस संबंधित प्लबंरनी लावल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवक अमर समर्थ यांनी केला. त्यावर शहर उप जल अभियंता चव्हाण यांनी ‘चुकीचे बोलू नको, खोटेनाटे आरोप करू नका. मी काही केले नाही’असे मोठया आवाजात उत्तर दिले. त्यावर नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला. यावरुन बैठकीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्या अधिकाऱ्याला बैठकीतून बाहेर घालवा असा आक्रमक पवित्रा नगरसेवकांनी घेतला. अखेर अधिकारी व पोलिसांनी, अधिकारी चव्हाण यांना बैठकीतून बाहेर नेले. त्याचवेळी अधिकारी चव्हाण यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी नगरसेवक आक्रमक झाले. आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.

महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू सभागृहात गुरुवारी, दोन एप्रिल २०२६ रोजी आढावा बैठक झाली. स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, गटनेते शारंगधर देशमुख, आदिल फरास यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. शहरातील अपुरा पाणी पुरवठा, घरफाळा बिले यासंबंधी चर्चा झाली. नगरसेवकांनी मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले. या चर्चेदरम्यान नगरसेवक समर्थ यांनी अधिकारी चव्हाण यांच्यावर आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप केले. प्लबिंग कामाच्या परवाना नूतनीकरणासाठी प्लंबरकडून अधिकाऱ्याने प्रत्येकी एक हजार रुपये घेतले आहेत. आणि त्यासंबंधी प्लंबरनी स्टेटसवर तशी पोस्ट व्हायरल केल्याचे बैठकीत निदर्शनास आणले. त्यावर चव्हाण हे उभे राहून नगरसेवकांकडे बोट करुन खोटे आरोप खपवून घेणार नाही’असे मोठया आवाजात उत्तर दिले. चव्हाण यांच्या विधानाला नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला.

नगरसेवक समर्थ, नगरसेवक विजय खाडे, विजय देसाई, प्रवीण केसरकर, आदिल फरास यांनी चव्हाण यांना ताकीत द्या, ज्या अधिकाऱ्यांवर सभाग़ृहात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आयुक्तांच्यासमोर मोठयाने बोलायचे धाडस कसे होते ? त्या अधिकाऱ्याला बैठकीतून बाहेर घालावा असा आग्रह धरला. तसेच कारवाई करावी यासाठी नगरसेवक आक्रमक बनले. गटनेते शारंगधर देशमुख यांनीही लोकप्रतिनिधींना उद्धट बोलणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, कारवाई झाली नाही तर पुढील बैठक, सभा होऊ देणार नाही असा इशारा दिला. महापौर निकम यांनी, ‘सभागृहात असला प्रकार खपवून घेणार नाही. पहिल्यांदा त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा असे आदेश दिले. आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी, शहर उपजल अभियंता चव्हाण यांच्यावर कारवाई केली जाईल असे बैठकीत सांगितले. एव्हाना इतर अधिकारी व पोलिसांनी चव्हाण यांना बैठकीतून बाहेर नेले.

पाणी पट्टीची बिले वाटप न करणाऱ्या मीटर रीडरवर दंडात्मक कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले. मीटर रीडरनी बिलाचे वाटप न केल्यामुळे पाणीपट्टी थकबाकी वाढल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्या मीटर रीडरच्या पगारातून दंडात्मक रक्कम कपात केली जाईल असे जल अभियंता हर्षजीत घाटगे यांनी सांगितले. नगरसेवक विजयेंद्र माने, नगरसेविका दीपाली घाटगे यांनी पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes