Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छत्रपती शिवराय, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी रथोत्सव थाटातपतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी  अरुंधती महाडिक ! खासदार धनंजय महाडिकांना सहकाररत्न पुरस्कार !!राज्यातील २५ बडया अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या, कोल्हापूरला तीन नवीन अधिकारीकार्तिकेयन एस यांची बदली, कोल्हापूर जिप सीईओपदी डॉ. जस्मिन के. मंजुलक्ष्मी यांची बदली, महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारुड अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघण यांची तडकाफडकी बदलीमहापालिकेत नगरसेवक- अधिकाऱ्यांत खडाजंगी, आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेशकेडीसीसी बँकेचा व्यवसाय २१ हजार ३७१ कोटींवर, ढोबळ नफा २८७ कोटीनालेसफाईचा सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करा - राजेश क्षीरसागर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे एक मुक्त विद्यापीठ, हसन मुश्रीफांची कोपरखळी

जाहिरात

 

पतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी  अरुंधती महाडिक ! खासदार धनंजय महाडिकांना सहकाररत्न पुरस्कार !!

schedule03 Apr 26 person by visibility 28 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांची महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने कोल्हापुरातील आनंद भवन इथे सहकारी पतसंस्थांचा महिला मेळावा पार पडला. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक यांना सहकाररत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. पतसंस्था फेडरेशनचे राज्य अध्यक्ष काकाजी कोयटे, शांतीलाल शिंगे, शशिकांत राजोबा, राजश्री पाटील, सुरेखा लवांडे, डॉ. अंजली शहा, भारती मुथा, अनिल पाटील, सहकार नियामक मंडळाचे सदस्य सदाशिव भुसारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे,  चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. पतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक यांची निवड झाल्याची घोषणा कोयटे यांनी केली.सहकारातून समृध्दीकडे देशाची वाटचाल सुरू आहे. अशा वेळेस पतसंस्थांची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी पतसंस्थांमधील ठेवींना ५ लाख रूपयांचं विमा संरक्षण मिळावे, युपीआय प्रणालीचा वापर करायला परवानगी मिळावी आणि गावातील सेवा सोसायट्यांना दिली जाणारी ४० प्रकारची कामे पतसंस्थांना दिली जावीत, या मागण्यांचा संसदेत पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. फेडरेशनचे अध्यक्ष काकाजी कोयटे यांनी, राज्यातील पतसंस्थांची सद्यस्थिती, त्यांच्यापुढील आव्हाने आणि मागण्या मांडल्या.यावेळी भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, कृष्णराज महाडिक यांचा सत्कार करण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes