Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राष्ट्र सेवा दलातर्फे दोन दिवसीय कार्यकर्ता कार्यशाळा - जिल्हास्तरीय मेळावापाच- सहा जूनला रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळाप्रशासनाधिकारी डी. सी.कुंभारांना लाच घेताना रंगेहाथ पकडले, पोलिसांची कारवाईजिल्हा नियोजन समितीची पुढील बैठक सदस्यांसोबतच, लवकरच निवडी होणार - पालकमंत्री प्रकाश आबिटकरप्रवेश प्रक्रिया विना डोनेशन पूर्ण करा, एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये - आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेतर्फे कर्मचाऱ्यांना २५ टक्क्यांहून अधिक पगारवाढशिवसेना नेहमीच मराठा समाजासोबत, समाजाला न्याय देण्याची भूमिका - मंत्री उदय सामंतविधान परिषदेसाठी भाजपकडून अकरा उमेदवारांची यादी जाहीर जिल्हा परिषदेच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम जिल्हा परिषदेत अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

जाहिरात

 

राष्ट्र सेवा दलातर्फे दोन दिवसीय कार्यकर्ता कार्यशाळा - जिल्हास्तरीय मेळावा

schedule01 Jun 26 person by visibility 34 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :- समताधिष्ठित समाज निर्मिती हे ध्येय घेऊन राष्ट्रसेवा दल ही संघटना देशभर कार्यरत आहे. या संघटनेचा  चार जून स्थापनादिन असून यानिमित्ताने कोल्हापूर येथे राज्यस्तरीय प्रमुख कार्यकर्ता कार्यशाळा व जिल्हास्तरीय मेळावा आयोजित केला आहे. तीन व चार जून २०२६ रोजी हे कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती मेळाव्याचे अध्यक्ष व अखिल भारतीय माजी अध्यक्ष भरत लाटकर आणि स्वागताध्यक्ष डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी दिली.
     फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा आणि संविधानाच्या मुख्य उद्देशानुसार शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील तरुण, वंचित घटक, आपत्ती निवारण यांच्या मध्ये संघटनेचे कार्य अविरत सुरू आहे. ४ जून १९४१ रोजी पुण्यात साने गुरुजी, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, आणि शिरूभाऊ लिमये या समाजवादी विचारवंतांच्या पुढाकारणे या संघटनेची पुनर्घटना करण्यात आली. गेली ८५ वर्षे ही संघटना कार्यरत आहे. 
        या निमित्ताने कोल्हापूर येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये ३ जून ला संघटनेची जबाबदारी घेऊन काम करणाऱ्या राज्य भारतील निवडक १५० कार्यकर्त्याची कार्यशाळा आयोजित केली असून यातून भविष्यातील कार्यपद्धती ठरविली जाणार आहे. याचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत सुनीलकुमार लवटे, आंतरभारती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष पल्लवी कोरगावकर, ख्यातनाम ओडिसी नृत्यकार झेलम परांजपे, सेवा दलाचे माजी अध्यक्ष प्रकाश कांबळे, चित्रकार राजा अवसक यांच्या उपस्थितीत होणार आहे. चार जून रोजी कोल्हापूर जिल्हा कार्यकर्ता मेळावा होणार असून यासाठी खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, पत्रकार युवराज मोहिते यासह संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते यांची अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे. मेळाव्याच्या निमित्ताने छत्रपती राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळ, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना मोटरसायकल रॅलीद्वारे अभिवादन करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठ कोल्हापूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष विजय भोगम, कोल्हापूर ग्रामीणचे कार्याध्यक्ष रावसाहेब आला असे, इचलकरंजी शहराध्यक्ष अनिल होगाडे, नगरसेवक राजेश लाटकर, माझी कार्याध्यक्ष श्रेणिक डिग्रजे, धनंजय धोत्रे, सुनील पोवार, पूर्ण वेळ सेवक बाबासाहेब नदाफ, चंदन माटुंगे इंद्रायणी पाटील, हेमलता पाटील, माजी नगरसेवक महेश जाधव आदी प्रयत्नशील आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes