प्रशासनाधिकारी डी. सी.कुंभारांना लाच घेताना रंगेहाथ पकडले, पोलिसांची कारवाई
schedule01 Jun 26 person by visibility 30 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे प्रभारी शिक्षणाधिकारी डी. सी. कुंभार यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शिक्षण समितीच्या कार्यालयाच्या बाहेरच पोलिसांनी कुंभार यांना ताब्यात घेतले आहे. कुंभार हे जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागात विस्तार अधिकारी आहेत. त्यांच्याकडे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकारीपदाचा प्रभारी कार्यभार आहे. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. कोल्हापूर महापालिका शाळेत जिल्हा बदलीहून आलेल्या शिक्षकाला नियुक्तीसाठी लाच मागितली होती. लाच घेत असतानाच सोमवारी, सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास प्राथमिक शिक्षण समितीच्या कार्यालयाच्या इमारतीबाहेरच त्यांना पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले.