Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या तज्ञसंचालकपदी  स्वप्निल घस्तेजागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उद्योजकांचा सन्मान, प्रशिक्षणर्थींना प्रमाणपत्र वितरण उत्साहातगुणीदास फाऊंडेशने घडविली ‘तीर्थ विठ्ठल’मधून अभंग -भक्तीसंगीताची वारीराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे कागलमध्ये जनसेवा सप्ताहतंर्गत उपक्रमकोल्हापुरात साहित्यिक, प्राध्यापक- शिक्षकांनी उगारली सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात निषेधाची मूठगोकुळतर्फे वारकऱ्यांना सुगंधी दुधाचे वाटप, पुईखडी परिसरात स्वच्छता मोहीमसोहळा भक्तीचा…भाव सेवेचा !धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, अखेर सरकार नमलेकोल्हापुरातील कवी - लेखक - प्राध्यापक – शिक्षक एकवटले, शनिवारी करणार धरणे आंदोलन ! जंतरमंतरवरील तरुणांचे वाढविणार मनोबल!शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशाकांत कोल्हापूर देशात द्वितीय स्थानावर

जाहिरात

 

विधान परिषदेसाठी भाजपकडून अकरा उमेदवारांची यादी जाहीर

schedule31 May 26 person by visibility 190 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : विधान परिषदेसाठी भारतीय जनता पक्षातर्फे 11 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.रविवारी रात्री ही यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये सोलापुरातून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर झाली. सांगली - सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून  धैर्यशील कदम यांना उमेदवारी मिळाली. नागपूर विधान परिषदेसाठी डॉ. राजीव पोतदार यांना तिकीट जाहीर झाले आहे. भंडारा-गोंदियातून अविनाश ब्रह्मणकरांना तर अमरावतीतून प्रवीण पोटे पाटलांना उमेदवारी मिळाली आहे. नांदेड येथून अमर राजूरकर तर अहिल्यानगरमधून अपेक्षेप्रमाणे प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी मिळाली. धाराशिव - बीडमधून बसवराज पाटील यांना तर जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी मिळाली आहे. वर्धा- चंद्रपूर- गडचिरोली अरुण लखाणी यांना उमेदवारी मिळाली. संभाजीनगर -जालना विधान परिषद मतदार संघातून सुहास शिरसाठ यांना उमेदवारी मिळाली

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes