Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रंगकर्मींचे भर पावसात आंदोलन, खाजगीकरणाच्या विरोधात बरसल्या घोषणाउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेनेतर्फे वृक्षारोपणशाळेची पटसंख्या वाढली, विभागीयस्तरावर क्रमांक ! मंत्र्यांकडून मुख्याध्यापक- शिक्षकांना शाबासकी ! !जिल्हा नियोजनचा २९२ कोटीचा निधी , आमदार -मंत्र्यांची नको भागिदारी ! शंभर टक्के निधी हवा जिप सदस्यांना, सर्वपक्षीय सदस्यांची सह्यांची मोहीम ! ! जिल्हा परिषद सदस्यांना समाधानकारक निधी देणार - मंत्री हसन मुश्रीफशिक्षण विभागाच्या कारभाराची दबक्या आवाजात चर्चा व्हायला नको : मंत्री मुश्रीफांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचनाविद्यार्थिनींच्या सहभागातून पर्यावरण संरक्षणाची चळवळ उभारू या : डॉ. जगन्नाथ पाटील खासगीकरणाला रंगकर्मींचा विरोध, मंगळवारी नाट्यगृहासमोर धरणे आंदोलनसंमेलन शाहू कार्य संवर्धनाचे !  निर्धार शाहू विचारांची ‘झेन झी’पिढी घडविण्याचे ! !जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या तज्ञसंचालकपदी  स्वप्निल घस्ते

जाहिरात

 

शिवसेना नेहमीच मराठा समाजासोबत, समाजाला न्याय देण्याची भूमिका - मंत्री उदय सामंत

schedule01 Jun 26 person by visibility 166 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : मराठा समाजाला न्याय देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेहमीच प्रयत्नशील आह. शिवेसना कायमच मराठा समाज बांधवासोबत आहे. मराठा समाजाच्या हितासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाच्या प्रश्नांची सोडवणुकीसाठी प्रयत्नशील आहेत. अंतरवाली सराटी आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारी पातळीवरुन ज्या चर्चा झाल्या, त्यामध्ये शिवसेनाही होती. असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. मराठा समाजाला न्याय देताना इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

मंत्री सामंत म्हणाले, ‘मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील व ओबीसी आरक्षण आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके या दोघांनीही मराठा व ओबीसी समाजात वैर निर्माण होणार नाही यासंबंधीची दक्षता घ्यावी असे आवाहनही मंत्री सामंत यांनी केले. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेतले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आरक्षणप्रश्नी जरांगे यांना पुन्हा आंदोलन करावे लागणार नाही यासाठी सरकार काम करत आहे.अंतरवाली सराटी येथे जरांगे यांनी जे आंदोलन केले त्याठिकाणी सरकारी प्रतिनिधी म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व इतर जण चर्चेसाठी गेले होते. त्या चर्चेत शिवसेना नव्हती हा गैरसमज आहे. याविषयी मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे फोनवरुन संपर्कात होते. मी ही, नेतेमंडळीशी चर्चा करत होतो. शिवाय तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच मराठा समाजाला पहिल्यांदा दहा टक्के आरक्षणाचा निर्णय झाला होता.’पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हा समन्यवक सत्यजीत कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक वैभव माने, स्वरुप कदम आदी उपस्थित होते.

………………

कोल्हापूरच्या राजकारणातील फरक कळेना

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसंबंधी प्रश्न विचारले असता मंत्री सामंत म्हणाले, ‘मी, शिवसेनेचा कोल्हापूर जिल्हयाचा संपर्कमंत्री आहे. रत्नागिरी जिल्हा हा कोल्हापूर लगतच आहे. मात्र कोल्हापुरात ‘कधी आमचं ठरलंयकधी आपलं ठरलंय’ या पद्धतीचे जे राजकारण असते ते अजून आपणाला कळलेले नाही. अजून दहा ते पंधरा वेळा येऊन गेल्यानंतर ते राजकारण कळेल.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes